एक्स्प्लोर

Marathi Actress : घरात मौल्यवान वस्तूंची चोरी, आईला पॅरालिसीसचा अटॅक; 'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्रीने शेअर केला धक्कादायक अनुभव

Jahnavi Killekar : भाग्य दिले तू मला फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेदार हिने तिच्या पेणच्या घरात चोरी झाली असल्याची माहिती दिली. सध्या या प्रकरणाचा तपास देखील पोलीस घेत आहे. 

Jahnavi Killekar :  कलर्स मराठी वाहिनीवर आलेल्या 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) ही सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. जान्हवीने तिच्या पेणच्या घरात चोरी झाली असल्याची माहिती तिने तिच्या सोशल मीडियावरुन दिली आहे. त्यातच ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सगळ्यात आधी कळाली. ते पाहून तिच्या आईला पॅरालिसीसचा झटका आला. त्यामुळे सध्या ही अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. 

या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने या सगळ्या घटनांची माहिती दिली. तिच्या या व्हिडीओला कॅप्शन देत तिने म्हटलं की, 'आपण सर्वांनी सतर्क व जागरूक राहण्याची गरज आहे. हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा.' जान्हवीच्या घरातल्या अनेक मौल्यवान गोष्टी चोरी गेल्या आहेत. या सगळ्याचा तपासही सध्या पेण पोलीस करत आहेत. 

जान्हवीने व्हिडीओमध्ये काय म्हटलं?

जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की,  'नमस्कार, मी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की, तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की माझं पेणमध्ये एक घर आहे. छोटासा बंगला आम्ही तिथे बांधलाय. पण ते आमचं विकेंड होम आहे. फक्त शनिवार रविवार आम्ही तिकडे जातो. पण नुकतच माझ्या त्या पेणच्या घरात चोरी झाली आहे. चोरांनी बऱ्याचश्या मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. जश्या की, आमच्या घरातले सगळे स्पीकर्स, माझ्या भावाची गिटार, माझ्या भावाचे वॉचचे कलेक्शन्स होते, हे सगळं चोरी गेलंय. आईच्या बराचश्या साड्या चोरीला गेल्या आहेत. चोरांना ज्या गोष्टी शक्य झाल्या, ते त्यांनी नेलं. एसी काढण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, पण कदाचित ते त्यांना जमलं नाही. फ्रिजही हलवण्याचा प्रयत्न केला गेलाय. काही गोष्टी त्यांना न्यायला जमल्या नसतील कदाचित, म्हणून त्यांनी नेल्या नाहीत.' 

पुढे तिने म्हटलं की,  'व्हिडीओ बनवण्याचं कारण असं की, तुमचंही असं एखादं बंद घर असेल, वीकेंड होम असेल, तर प्लीज काळजी घ्या. कारण चोरांचा अगदी सुळसुळाट झाला आहे. म्हणजे मला असं वाटतं की, ते अगदीच नजर ठेवून असतात. या घरी कोण किती वाजता येतं, कोण असतं. या सगळ्या गोष्टींवर ते लक्ष ठेवतात आणि व्यवस्थित वेळ साधून ते चोरी करुन जातात. आपण खूप आवडीने काही गोष्टी घेतलेल्या असतात आणि अचानक असं सगळं झाल्यावर त्या गोष्टीचा धक्का बसतो. नक्की कोणत्या दिवशी चोरी झालीये हे आम्हालाही माहित नाही. गेल्या शनिवारी जेव्हा आई-बाबा गेले होते, तेव्हा हा सगळा प्रकार आम्हाला समजला. पण माझ्या आईला या सगळ्या गोष्टींचा धक्का बसला आणि तिला पॅरालिसीसचा अटॅक आला. अजूनही ती रुग्णालयातच आहे. म्हणून तुमचंही असं बाहेर कुठे घर असेल तर काळजी घ्या.' 

View this post on Instagram
 
A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

ही बातमी वाचा : 

Marathi Actress :  एसी लोकलमुळे गैरसोय, मराठी अभिनेत्रीची तीव्र नाराजी; म्हणाली, 'इतक्या बेभरवशाच्या वेळेत...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  7PM : 6 ऑक्टोबर  2024: ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज :   7PM : 6 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget