Dance Deewane Junior : आठ वर्षाच्या आदित्य पाटीलनं पटकावला डान्स दीवाने ज्युनियरचा किताब; ट्रॉफी घेताना म्हणाला, 'आजोबांसाठी करेन हे काम '
आदित्य पाटील (Aditya Patil) हा डान्स दीवाने ज्युनियर (Dance Deewane Junior) या कार्यक्राचा विजेता ठरला आहे.
Dance Deewane Junior Winner Aditya Patil : डान्स दीवाने ज्युनियर (Dance Deewane Junior) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडला. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचा विजेता आदित्य पाटील (Aditya Patil) हा स्पर्धक ठरला आहे. आदित्य पाटील हा आठ वर्षाचा आहे. जेव्हा डान्स दीवाने ज्युनियर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदित्य हा प्रतीक गँगमध्ये होता. नृत्यदिग्दर्शक प्रतीक उतेकर (Pratik Utekar) यांनी या सिझनमध्ये त्याला डान्सचे प्रशिक्षण दिले. मात्र, फिनालेदरम्यान तुषार शेट्टीच्या (Tushar Shetty) ऑल स्टार्स ग्रुप आणि आदित्य पाटील यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. पण आदित्यला जास्त मत मिळाली आणि तो विजेता ठरला.
आदित्य आजोबांसाठी करणार हे काम
डान्स दीवाने ज्युनियरची ट्रॉफी जिंकल्यानंतर आदित्य पाटील खुप उत्साहित झाला. आदित्यला डान्स दीवाने ज्युनियर शो जिंकल्यानंतर 20 लाख रुपये मिळाले. त्या 20 लाखांचा वापर तो त्याच्या आजोबांसाठी घर बांधण्यासाठी करणार आहे, असं आदित्यनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं. मुलाखतीमध्ये आदित्यने सांगितले की, मिळालेल्या पैशांमधून तो श्याम भैय्याला काही पैसे देईल, कारण आदित्य त्याच्याकडून डान्स शिकला. त्यानंतर तो म्हणाला की, तो आजोबांना काही पैसे देणार आहे आणि उरलेल्या पैशातून आजोबांसाठी तो घर बांधणार आहे.
View this post on Instagram
आदित्यच्या आजोबांची रिअॅक्शन
डान्स दीवाने ज्युनियर हा शो जिंकल्यानंतर आदित्यनं त्याच्या अजोबांनी दिलेल्या रिअॅक्शनबद्दल सांगितलं. आदित्य म्हणाला की, माझे आजोबा खूप आनंदी आहेत. जेव्हा माझे आजोबा म्हणाले की तू आता विजेता झाला आहेस त्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. 'असाच पुढे जात राहा', अशी प्रतिक्रिया आदित्यच्या आजोबांनी दिली. डान्स दीवाने ज्युनियरच्या या ग्रँड फिनालेला आमिर खाननं हजेरी लावली होती.
हेही वाचा: