एक्स्प्लोर

Lockdwon | बिग बॉस 2 विनर आशुतोष कौशिक विवाहबंधनात; लॉकडाऊनमुळे घराच्या गच्चीवर घेतली सप्तपदी

बिग बॉस 2 चा विजेता आशुतोष कौशिकने लॉकडाऊनमध्येच आपला लग्नसोहळा आटोपला आहे. त्याने आपल्या या विवाहसोहळ्याचे खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नवी दिल्ली : बिग बॉस 2 चा विजेता आशुतोष कौशिकने लॉकडाऊनमध्येच लग्न केलं आहे. आपल्या लग्नाचे खास व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनमुळे आशुतोष कौशिकने आपल्या लग्नाची तारिख पुढे न ढकलता, खास अंदाजात राहत्या घराच्या गच्चीवर लग्नसोहळा आटोपला. हा विवाहसोहळा अत्यंत सुरक्षितरित्या आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळत पार पडला.

आशुतोषचा लग्नसोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. या लग्नसोहळ्यात दोन्ही कुटुंबातील चार लोकं उपस्थित होती. याचसोबत आशुतोषने आणखी एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. त्याने आपल्या लग्नासोहळ्याची सर्व रक्कम पीएम केअर फंड्सला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहते त्याचं कौतुक करत आहेत.

बिग बॉस फेम आशुतोष उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील राहणारा आहे. त्याने अलीगढमध्ये राहणाऱ्या अर्पितासोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे नोएडा, सेक्टर 100 येथील आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर आपल्या आशुतोषचा विवाहसोहळा पार पडला. असं सांगितलं जात आहे की, लॉकडाऊनच्या आधीच आशुतोष आणि अर्पिताचं लग्न ठरवण्यात आलं होतं. 26 एप्रिलला लग्नाची तारिख ठरवण्यात आली होती. अशातच आशुतोष तारिख पुढे ढकलण्याऐवजी त्याच दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आशुतोष कौशिकने आपल्या फेसबुक अकाउंटवरून आपल्या या खास लग्नसोहळ्याचे खास व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओंमध्ये आशुतोष आणि अर्पिता सप्तपदी घेताना दिसत आहेत. या दोघांचं लग्न लावून देण्यासाठी जे भटजी उपस्थित होते, त्यांनीही मास्क लावला होता. व्हिडीओच्या बँकग्राउंडला असलेले लोक सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करताना दिसत आहेत.

दरम्यान, आशुतोष कौशिक 'एमटीव्ही रोडीज' जिंकल्यानंतर चर्चेत आला होता. त्यावेळी तो टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा बनला होता. 'रोडीज'नंतर तो 'बिग बॉस'मध्येही सहभागी झाला होता. बिग बॉस 2 ची ट्रॉफी त्याने आपल्या नावे केली होती.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्येच 'या' स्टार कपलच्या घरी आली नवी पाहुणी; पाहा फोटो

PHOTO | एकता कपूरने शेअर केलेल्या जुन्या फोटोवर स्मृती इराणी म्हणतात...

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
TV Show C.A.T.S. : 32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget