एक्स्प्लोर

Big Boss Marathi 2 : बिचुकलेंविरोधातील तक्रार मागे, बिग बॉसच्या घरात परतण्याचा मार्ग मोकळा

अभिजीत बिचुकलेचा बिग बॉसमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सातारा : अभिजीत बिचुकलेला खंडणीच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. फिर्यादीनेच स्वत:हून तक्रार मागे घेतल्याने अभिजीत बिचुकलेचा बिग बॉसमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिचुकलेला अटक झाल्यापासून बिग बॉसची टीम साताऱ्यात ठाण मांडून होती. आता तक्रार मागे घेतल्याने टीम बिचुकलेला घेऊन पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे. बिचुकलेवर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीने स्वत:हून न्यायालयात "माझी अभिजीत बिचुकलेविरोधात कोणतीही तक्रार नाही" असं लिहून दिल्यामुळे आता बिचुकलेला मोठा दिलासा मिळाला आहे. अभिजीत बिचुकलेमुळे साताऱ्याचं नाव उंचावले जात होते आणि अभिजीत बिग बॉसचे पारितोषिक मिळेल असाच खेळत असल्यामुळे त्याला बक्षीस मिळणार अशी आशा असल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे. बिचुकलेच्या विरोधातील तक्रार स्वत:हून मागे घेतल्याचं तक्रारदार फिरोज पठाण यांनी न्यायालयात लिहून दिले. 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी अभिजीत बिचुकलेला जामीन मिळाला होता. मात्र खंडणीप्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. बिचुकलेला सेटवरुन अटक करण्यात आली होती. सह दिवाणी न्यायाधीश आर व्ही पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. सातारा पोलिसांनी अभिजीत बिचुकलेला सेटवरुन अटक केली होती. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजेच अटकेच्या वेळी बिचुकलेने कोणताही विरोध केला नव्हता. दरम्यान अटक केल्यानंतर बिचुकलेने राजकीय स्वार्थासाठी 2015 सालचं जुनं प्रकरण उकरुन काढल्याचा आरोप केला होता. अटक केल्यानंतर न्यायालयात दाखल होण्यापूर्वी बिचुकलेचा रक्तदाब वाढला होता. रक्तदाब वाढल्याने बिचुकलेला सातारा जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बिचुकलेला कोर्टात हजर केलं होतं. दरम्यान, अभिजीत बिचुकलेने बिग बॉसच्या घरातील सहस्पर्धक आणि अभिनेत्री रुपाली भोसलेला शिवीगाळ केली होती. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या 24 व्या भागात हा प्रकार घडला होता. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेला शोमधून हकालपट्टी करा, अशी मागणी  केली होती. अभिजीत बिचुकले हे 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेला एकमेव राजकीय नेता आहे. अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत असतो, आता या नव्या वादाची त्यात भर पडली आहे. कोण आहे अभिजीत बिचुकले? - साताऱ्यातच मागासवर्गीय घरात बिचुकलेचा जन्म झाला - घरात धार्मिक वातावरण, ज्योतिष हा  परंपरागत व्यवसाय - बिचुकले सातारा नगरपालिकेत कर्मचारी होता - पण सुट्ट्यांच्या कारणावरुन 6 वर्षांपूर्वी राजीनामा दिला - त्यानंतर उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन - त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी जाहीर करणे - आणि त्यानंतर ऐनवेळी माघार घेणे हे प्रकार सुरु केले - उदयनराजेंविरोधात त्याने अनेकदा खासदारकीही लढवली - पण कधीही 2 हजार मतांच्या वर त्याची मजल गेली नाही - यंदा त्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता - इतकंच काय त्यानं आपल्या पत्नीलाही निवडणुकीत उभं केलं - अभिजीत बिचुकलेवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत संबंधित बातम्या 'बिग बॉस'च्या शाळेत इव्हेंच्युअली बिचुकले गुरुजी देणार इंग्रजीचे धडे मी फक्त एकालाच घाबरतो, अभिजीत बिचुकलेला : उदयनराजे भोसले बिचुकलेंना 'बिग बॉस'मधून बाहेर काढा, भाजपच्या माजी नगरसेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीला Big Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात बिचुकले का बिथरले?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget