एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Rakhi Sawant : माजोरड्या निक्कीची जिरवायला बिग बॉस राखीला आणा; नेटकऱ्यांची मागणी

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Rakhi Sawant : निक्कीला अद्दल घडवण्यासाठी नेटकऱ्यांनी थेट राखी सावंतला घरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Rakhi Sawant : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi Season 5) तिसरा आठवडा सुरू झाला असून बहुतांशी सगळेच स्पर्धक आता आपला खेळ खेळू लागले आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्याच दिवसापासून आरडाओरड आणि आक्रमक भूमिकेने निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. निक्की तांबोळीने बोलण्याच्या ओघात, चढ्या आवाजात बोलताना वर्षा उसगावंकर (Varsha Usgaonkar) यांच्यासह घरातील इतर सदस्यांनादेखील उलटसुलट बोल लावले होते. 'भाऊचा धक्का'मध्येही रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) निक्कीला यावरून चांगलेच झापले आहे. मात्र, निक्कीच्या वागण्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे निक्कीला अद्दल घडवण्यासाठी नेटकऱ्यांनी थेट राखी सावंतला (Rakhi Sawant) घरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. 
 
राखी सावंत आणि निक्की तांबोळी यांनी हिंदी बिग बॉसमधील 14 व्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता.  'बिग बॉस मराठी'च्या घरात यंदाच्या सीझनमध्ये सहभागी झालेली निक्की तांबोळी ही इतर सदस्यांना जुमानत नाही. त्याशिवाय, तिला जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल आणि वैभव चव्हाणची साथ आहे. घरातील इतर सदस्यांना उलटसुलट बोलणं, भांडण उकरून काढण्याचे प्रकार होत असल्याने प्रेक्षकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. 

निक्कीच्या या दादागिरीला वैतागून आता प्रेक्षकांनी राखी सावंतला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याची मागणी केली आहे. बिग बॉस 14 मध्ये राखी सावंतने निक्की तांबोळीला जसास तसे उत्तर दिले होते. या दोघींमधील वादात अनेकदा निक्कीने राखीसमोर माघार घेतली. बिग बॉसच्या घरातील निक्की आणि राखी यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राखी निक्कीला सुनावताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by गावरान तडका (@gavraantadka)

निक्कीला हीच पाहिजे..

सोशल मीडियावर निक्की आणि राखीच्या वादाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये युजर्सकडून निक्कीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. एका युजरने म्हटले की, राखी सावंत ला मराठी बिग बॉस मध्ये पाठवलं पाहिजे. या युजरच्या म्हणण्याला इतरांनी दुजोरा दिला. एकाने म्हटले की, या निक्कीचा सगळा माज उतरवून ठेवेल असे म्हटले. राखी सावंत ला पुन्हा एकदा मराठी बिग बॉस मध्ये संधी मिळाली पाहिजे ही बिग बॉसला विनंती आहे, असे एका युजरने म्हटले. व्हिडीओ पाहून एका युजरने म्हटले की बाईईईई...राखीला घाबरते असे एकाने म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Sanjay Pandey : संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरलाiPhone 16 in BKC Apple Store : iPhone 16 खरेदीसाठी मुंबईतील BKC मध्ये सकाळपासून रांगाKhed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हानसकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 20 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Sanjay Pandey : संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
मोठी बातमी! 2 रुपयांनी वीज स्वस्त होणार? 16 हजार मेगावॅट सौरऊर्जेचं उद्दीष्ट,  50 हजार एकर जमीनीचं संपादन
मोठी बातमी! 2 रुपयांनी वीज स्वस्त होणार? 16 हजार मेगावॅट सौरऊर्जेचं उद्दीष्ट,  50 हजार एकर जमीनीचं संपादन
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
Embed widget