एक्स्प्लोर
बिचुकलेंना 'बिग बॉस'मधून बाहेर काढा, भाजपच्या माजी नगरसेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
अभिजीत बिचुकलेंनी रुपाली भोसलेच्या घटस्फोटाचा उल्लेख करत तिच्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं, असा दावा करत भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.
![बिचुकलेंना 'बिग बॉस'मधून बाहेर काढा, भाजपच्या माजी नगरसेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीला BJP ex corporator Ritu Tawade demands to throw out Abhijeet Bichukale out of Marathi Bigg Boss बिचुकलेंना 'बिग बॉस'मधून बाहेर काढा, भाजपच्या माजी नगरसेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/20083846/Bigg-Boss-Marathi-Abhijeet-Bichukale-Rupali-Bhosale.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेले एकमेव राजकीय नेता अभिजीत बिचुकले यांची रिअॅलिटी शोमधून हाकलपट्टी करा, अशी मागणी होत आहे. बिचुकलेंनी बिग बॉसच्या घरातील सहस्पर्धक आणि अभिनेत्री रुपाली भोसलेला शिवीगाळ केली होती. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेंना शोमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे.
अभिजीत बिचुकलेंनी रुपाली भोसलेच्या घटस्फोटाचा उल्लेख करत तिच्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा रितू तावडे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे वडिलांवरुन अश्लाघ्य भाषेत हेटाळणी केली. या शेरेबाजीमुळे घटस्फोटित महिला, परित्यक्ता, सिंगल मदर महिलांचा अवमान होत असल्याचा आरोप रितू यांनी केला. रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी कारवाई करण्याचा अधिकार राज्य शासनाचा असल्याचं स्पष्टीकरण दिल्याचं रितू तावडे यांचं म्हणणं आहे. संबंधित वाहिनी आणि अभिजित बिचकुलेंवर कारवाई न झाल्यास रितू तावडे यांनी दिला आंदोलनाचा इशारा दिला आहे. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या 24 व्या भागात हा प्रकार घडला होता.
काय झालं नेमकं?
बिग बॉसने घरातील सदस्यांना एक कार्य सोपवलं. त्यात 1 ते 10 क्रमांक क्रमाने उभे करण्यात आले होते. घरातील कामगिरीनुसार ज्या सदस्याला स्वतःसाठी जो क्रमांक योग्य वाटतो, त्याने त्या क्रमांकावर जाऊन उभं रहायचं होतं. आपण त्या क्रमांकावर का उभे आहोत, याचं स्पष्टीकरणही द्यायचं होतं.
टास्क सुरु झाल्यानंतर प्रत्येक जण त्याला योग्य वाटेल त्या क्रमांकावर जाऊन उभे राहिले. अभिजीत केळकरने पहिला क्रमांक गाठला. किशोरी शहाणे दुसऱ्या, तर नेहा शितोळे तिसऱ्या स्थानावर उभ्या राहिल्या. बझर वाजण्याआधीच बिचुकले चौथ्या क्रमांकावर जाऊन उभे राहिले. त्यामुळे रुपालीला सातव्या क्रमांकावर उभं राहावं लागलं. आपली योग्यता ही आपल्याला मिळालेल्या क्रमांकापेक्षा जास्त असल्याचं सांगत रुपालीने थेट बिचुकलेंवरच हल्ला चढवला.
आतापर्यंत बिचुकले कसे वागले, त्यांनी आपल्या टीमला कसं फसवलं, ते कोणाशी किती आणि कसं खोटं बोलले याचा सगळा लेखाजोखाच रुपालीने मांडला. पण बिचुकलेही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. त्यांनी रुपालीचे हे सगळे आरोप फेटाळून लावले. आता केलेले आरोप फेटाळणं हे राजकारण्यांसाठी काही नवीन नाही म्हणा. पण बिचुकलेंनी आरोप मान्य करण्यास नकार दिल्यावर रुपालीने त्यांच्या भावनिक बाजूलाच हात घातला आणि त्यांना थेट त्यांच्या मुलीची शपथ घ्यायला लावली.
मुलीचं नाव घेतल्यानंतर मात्र बिचुकले चांगलेच बिथरले. ते इतके बिथरले की त्यानंतर ते जे काही बोलले ते पाहताना मूकपट बघितल्याचाच भास झाला. शिव्यांचा प्रचंड भडिमार केल्यामुळे बिचुकल्यांचा आवाज पुन्हा एकदा म्यूट करावा लागला. या सगळ्या गडबडीत बिचुकलेंनी आपली चौथ्या क्रमांकावरची जागा सोडली आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेत रुपालीने ती जागा काबीज केली.
बिचुकले एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी थेट मी हा खेळ सोडतोय, असले फालतू खेळ मला खेळायचे नाहीत, असं म्हणत थेट बिग बॉसना आपली बॅग भरायला सांगितली. यथावकाश हे प्रकरण शांत झालं. रुपालीने बिचुकलेंची माफीही मागितली. मात्र महेश मांजरेकरांनी वारंवार बजावूनही अपशब्द वापरले जात असल्यामुळे बिचुकलेंवर काय कारवाई होणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)