एक्स्प्लोर

बिग बॉसच्या घरात दुसरीशी सूत, गर्लफ्रेण्डकडून ब्रेकअप जाहीर

बिग बॉसच्या घरात अभिनेता महत राघवेंद्र आणि अभिनेत्री याशिका आनंद या दोघांमधील वाढत्या जवळीकीमुळे महतची गर्लफ्रेण्ड प्राची मिश्राने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं, मात्र काही तासातच ही पोस्ट तिने डिलीटही केली.

मुंबई : बिग बॉस चवीने पाहणारे जितके चाहते आहेत, तितकेच या शोला नाव ठेवणारे, बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याचा आरोप करणारे प्रेक्षकही आहेत. 'बिग बॉस'च्या घरात जुळणारे प्रेमसंबंध प्रेक्षकांना नवीन नाहीत. मात्र 'बिग बॉस तमिळ'मध्ये घडलेला प्रकार कदाचित नवीनच आहे. अभिनेता महत राघवेंद्र आणि अभिनेत्री याशिका आनंद या दोघा स्पर्धकांमधील वाढत्या जवळीकीमुळे महतची गर्लफ्रेण्ड प्राची शर्माने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. मात्र काही तासातच ही पोस्ट तिने डिलीटही केली. तामिळ अभिनेता महत आणि मॉडेल-अभिनेत्री प्राची शर्मा यांचे प्रेमसंबंध जगजाहीर आहेत. 'बिग बॉस तमिळ'चा दुसरा सिझन सुरु आहे. महतने शोमध्ये प्रवेश करतानाच आपली गर्लफ्रेण्ड प्राचीचा उल्लेख केला होता. आपण प्राचीला मिस करु, असंही तो म्हणाला होता. कॅमेराशी बोलत सुरुवातीच्या काळात तो प्राचीशी गप्पाही मारायचा. बिग बॉसच्या घरात जसजसे दिवस सरत गेले, तशी याशिका आणि महतमधील जवळीक वाढताना दिसली. स्पर्धेत सहभागी असलेले इतर सदस्य, चाहते यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. मंगळवारच्या भागात तर कहर झाला. महतने आपण याशिकाच्या प्रेमात पडल्याची कबुली दिली. मात्र प्राचीही आपल्या मनात असल्याचं त्याने सांगितलं. एपिसोड टेलिकास्ट झाल्यावर प्राचीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सहानुभूती दाखवली. त्यानंतर प्राचीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि आपण महतशी ब्रेक अप करत असल्याचं जाहीर केलं. बिग बॉसच्या घरात शिरताना महतने प्राचीवर आपलं किती प्रेम आहे, हे सांगतानाचा व्हिडिओ प्राचीने शेअर केला. 'महत अशाप्रकारे बिग बॉसच्या घरात गेला होता. माझं ज्याच्यावर प्रेम आहे, त्याला मी आत पाठवलं. बिग बॉसच्या वेळेनुसार आम्ही आमच्या आयुष्यातील गोष्टीत बदल केले. मला सहानुभूतीचे मेसेज पाठवणाऱ्यांना समजावं यासाठी मी माझं वैयक्तिक आयुष्य जाहीर करत आहे. तो प्रेमात होता आणि मी अजूनही.... आता मी त्याच्या सोबत नाही. पण मी त्याला प्रत्यक्ष भेटेन आणि सगळ्या गोष्टींवर चर्चा करेन' असं प्राची म्हणते. 'तो याशिकाच्या प्रेमात आहे आणि आता हे उघड झालं आहे. पण मी दुखावले गेले आहे. मी माझी काळजी घेईन. तो मुमताझशी वाईट वागला आणि तो त्याची एकमेव हितचिंतक जननीच्या पाठीशी उभा राहिला नाही. तुम्हा सर्वांना विनंती आहे, मला त्याच्याबद्दल काहीही विचारु नका. तुमच्या काळजीबद्दल आभार. मी महत सोबत नाही, माझं सोशल मीडिया सोडा' असंही प्राचीने पुढे स्पष्ट केलं. बिग बॉसच्या घरात दुसरीशी सूत, गर्लफ्रेण्डकडून ब्रेकअप जाहीर ब्रेकअपची पोस्ट काही तासांनंतर प्राचीने डिलीट केली. त्यामुळे प्राची आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करत असावी, अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
Osman Hadi Death: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Pune News: पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!

व्हिडीओ

Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
Osman Hadi Death: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Pune News: पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
Pune Shivsena: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
Omraje Nimbalkar: एवढा उन्माद येतो कुठून? तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? सरपंच देशमुखांच्या हत्याप्रमाणेच हत्या करायची होती का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
Embed widget