एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : दुसऱ्याच आठवड्यात 'बिग बॉस मराठी'च्या घरात लव्ह ट्रँगल! कोण पडलंय कोणाच्या प्रेमात?

Bigg Boss Marathi Season 5 : दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात आणखी एक प्रेम प्रकरण सुरू होतंय का, याची चर्चा सुरू झाली आहे. हे प्रेम प्रकरण हे लव्ह ट्रँगल आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 12 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात (Bigg Boss Marathi New Season) सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. अरबाज आणि निक्कीची स्ट्राँग मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ शकतं असा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात आणखी एक प्रेम प्रकरण सुरू होतंय का, याची चर्चा सुरू झाली आहे. हे प्रेम प्रकरण हे लव्ह ट्रँगल आहे. बिग बॉसच्या घरात आता आणखी काय घडणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात फ्लर्टिंग सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर  या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आता बिग बॉस मराठीच्या घरात दुसरी लव्ह स्टोरी सुरू होणार असल्याची चिन्ह आहेत. 

रांगड्या मातीत 'परदेसी' प्रेमाचं रोपटं फुललेलं दिसून आलं. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले जाऊ लागले आहे. बिग बॉसने देखील वैभवची फिरकी घेतली होती. आता, रॅपर आर्यादेखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आर्याचा हार्टब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार? हे येणारा काळच ठरवेल.

वैभव म्हणतो, मी तुला कोणतंही इंटेंशन दिलं नाही, आर्या म्हणाली..

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव आणि इरिना मजा-मस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान वैभव म्हणतो,"कसली क्यूट आहे यार ही". पण दुसरीकडे आर्या मात्र हार्टब्रेक झाल्याने ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. पुढे वैभव आर्याला विचारतो,"काय विषय आहे नक्की?". त्यावर आर्या म्हणते,"मला तू नॅचरली अॅटरॅक्टिव्ह वाटतो". यावर वैभव म्हणतो,"मी तर तुला असं कोणतं इंटेंशन दिलेलं नाही". पण आर्या म्हणते,"मला होऊ शकतं अॅटरॅक्शन".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, सुरज चव्हाण, निखिल दामले, निक्की तांबोळी आणि घन:श्याम दरवडे हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा सदस्यांमधून या आठवड्यात कोण 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेणार हे भाऊच्या धक्क्यावर वीकेंडला समजणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवारांवर सर्वात मोठा आरोप,जितेंद्र आव्हाडांची स्फोटक मुलाखतMuddyache Bola At Shivajipark : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट शिवाजी पार्कमधूनUddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
×
Embed widget