Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : ''फुसकी बॉम्बसारखं...'' निक्कीने आता संग्रामला डिवचलं, चॅलेंज देत म्हणाली, ''हिंमत असेल तर...''
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : निक्कीने थेट संग्राम चौगुलेला डिवचत थेट ओपन चॅलेंज दिले आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi Season 5) खेळ सुरू होऊन आता 50 दिवस पूर्ण झाले आहेत. घरातील सदस्यांमध्ये टास्कशिवायही राडा सुरू आहे. बिग बॉसच्या घरातून वैभव चव्हाणने (Vaibhav Chavan) निरोप घेतला. आता, घरातील नव्या समीकरणांची उत्सुकता प्रेक्षकांना असताना निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) थेट संग्राम चौगुलेला (Sangram Chougule) डिवचलं आहे. निक्कीने संग्रामला ओपन चॅलेंज दिले आहे.
निक्की, अरबाज आणि संग्राम यांच्यात कायम वाद होताना दिसून येतात. आता आजच्या भागातही प्रेक्षकांना त्यांच्यात खटके उडताना दिसून येणार आहेत. "दम असेल तर तोंडावर बोल", असं निक्की संग्रामला खुलं चॅलेंज देताना प्रोमोमध्ये दिसली आहे.
'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की संग्रामला खुलं चॅलेंज देताना दिसत आहे. संग्रामही निक्कीला तिच्या खेळाबद्दल बोलताना दिसून येत आहे. प्रोमोमध्ये निक्की आणि अरबाजला संग्राम म्हणतोय,"जवळच्या माणसांना खड्ड्यात घालायचं". त्यावर निक्की म्हणतेय,"फुसकी बाँबसारखं इनडायरेक्ट बोलायचं नाही या घरात...दम असेल तर तोंडावर बोलायचं". संग्रामला फुसकी बॉम्ब म्हटल्याने अरबाजला आनंदाच्या उकळ्या फुटल्या.
View this post on Instagram
तर, संग्रामने पुढे म्हटले की,"कोणत्या गोष्टी कशा घ्यायच्या हे तुम्ही ठरवताय". पुढे निक्की म्हणतेय,"स्वत:चं डोकं थोडं वापरा आणि नीट बोला. ना तळ्यात ना मळ्यात अशा परिस्थितीत तुम्ही अडकले आहात". संग्राम पुढे म्हणतोय,"तुमच्यातल्या एकाला तुम्हीच बाहेर काढणार आहात", असे संग्राम बोलताना दिसून आला आहे. त्यामुळे आता या आठवड्यात काय घडणार, कोणता सदस्य नॉमिनेट होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
भाऊच्या धक्क्यावर रितेशने घेतली संग्रामची शाळा...
वाईल्ड कार्ड असणारा सदस्याला बिग बॉसचा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा गेम प्लॅन या आठवड्यात तरी प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. टास्कमध्ये अरबाज आणि वैभवला संग्राम भिडावा, अशी अपेक्षा होती. पण, तो टास्कमध्ये कुठेही दिसला नाही. यावरून होस्ट रितेश देशमुखने संग्रामची कानउघडणी केली होती.
वैभव चव्हाण घराबाहेर...
वीकेंडला झालेल्या भाऊचा धक्क्यावर वैभव चव्हाण हा घरातून बाहेर पडणारा सदस्य ठरला आहे. तर, निक्कीच्या कानशिलात लगावल्याने आर्यावर कारवाई करत बिग बॉसने तिला थेट घराबाहेर काढले. त्यामुळे या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर पडले.