Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात या आठवड्यात नो एलिमिनेशन, पण पुढच्या वीकमधील नॉमिनेशनने वाढवलं टेन्शन
Bigg Boss Marathi 5 Elimination : बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात सहा सदस्य घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले होते.
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचं (Bigg Boss Marathi Season 5) नवीन सीझन प्रचंड चर्चेत आहे. पहिल्या आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील एलिमिनेट झाले. या आठवड्यातही सहा सदस्य घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यामध्ये निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे आणि घनश्याम दरोडे हे सदस्य घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले होते. पण, या आठवड्यात बिगर बॉसच्या घरातील स्पर्धक आणि बिग बॉस प्रेमींनी दिलासा मिळाला आहे. या आठवड्यात कोणताही स्पर्धक घराबाहेर पडलेला नाही.
बिग बॉसच्या घरात या आठवड्यात नो एलिमिनेशन
बिग बॉसच्या घरात दुसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर जोरदार कल्ला पाहायला मिळाला. यासोबत घरातील सहा सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. मात्र, रितेश भाऊने घरातील सदस्यांना एक गोड बातमी दिली. बिग बॉस मराठीच्या घरातील या आठवड्यात नो एलिमिनेशन म्हणजेच कोणताही सदस्य बाहेर पडला नाही.
View this post on Instagram
'बिग बॉस मराठी'च्या मंचावर खिलाडी कुमार
'बिग बॉस मराठी'च्या मंचावर 'खेल खेल में' या चित्रपटाची टीम कल्ला करताना पाहायला मिळाली. त्यांच्या कल्ल्याने रविवारचा 'भाऊचा धक्का' एकदम झापुक झुपुक झाला. शनिवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने सदस्यांना चांगलाच धडा शिकवला. तर काहींचं कौतुक केलं. रविवारी भाऊच्या धक्क्यावर फुल इंटरटेनमेंट पाहायला मिळाली.
निक्कीची चुगली समोर येताच जान्हवीला आली भोवळ
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. दुसऱ्या आठवड्यात काही चतुर म्हणून पुढे आले तर काही फितुर म्हणून. जान्हवी किल्लेकरने हा दुसरा आठवडा चांगलाच गाजवला. रितेश भाऊने शनिवारच्या भागात तिची चांगलीच शाळा घेतली. तर रविवारच्या भागातही रितेश भाऊनं तिचं सत्य समोर आणलंहे. सर्व मेहनत आपण करायची आणि निक्की क्रेडिट घेऊन जाते, अशी चुगली जान्हवीने केल्याचं जान्हवीचं सत्य रितेश भाऊने समोर आणताच तिला भोवळ आली.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :