Bigg Boss Marathi : छोट्या पाहुण्याचं आगमन ते कॅप्टन्सीच्या टास्कमधील राडा, भाऊच्या धक्क्यावर आज कुणाचा नंबर?

Bhaucha Dhakka Ritiesh Deshmukh : बिग बॉस मराठीच्या घरात झालेल्या टास्कवरुन आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सदस्यांना झापणार असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

Continues below advertisement

Bigg Boss Marathi  Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात आज भाऊचा धक्का पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात तिसऱ्या आठवड्यात खूप कल्ला आणि राडा पाहायला मिळाला. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीसाठीचे दोन टास्क पार पडले, ज्यामध्ये घरातील सदस्यांची तू-तू, मैं-मैं आणि फुल ऑन राडा पाहायला मिळाला. भाऊच्या धक्क्यावर आज रितेश भाऊ सदस्यांची शाळा घेईल. त्याशिवाय आज घरातील एका सदस्य घराबाहेर जाईल. आज रितेश भाऊ कुणाला झापणार आणि कोणता सदस्य घराबाहेर जाणार हे पाहावं लागणार आहे. 

Continues below advertisement

भाऊच्या धक्क्यावर आज कुणाचा नंबर? 

बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये आजच्या भाऊच्या धक्क्याची झलक दाखवण्यात आली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात झालेल्या टास्कवरुन रितेश देशमुख सदस्यांना झापणार असल्याचं यामध्ये दिसत आहे. रितेश भाऊच्या रडारवर आज कोण असणार याची उत्सुकता बिग बॉस प्रेमींना लागली आहे.

छोट्या पाहुण्याचं आगमन ते कॅप्टन्सीच्या टास्कमधील राडा

कलर्स मराठीने बिग बॉस मराठी भाऊचा धक्क्याचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये लाडका रितेश भाऊ म्हणतो की, "आठवडाभर घरात एक छोटासा पाहुणा आला, पण त्याच्या येण्याने घरात मोठा राडा झाला. चर्चा करुया या सगळ्यावर भेटूया भाऊच्या धक्क्यावर".

रितेश भाऊ कुणाला रडारवर घेणार?

भाऊच्या धक्क्यावर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया काय?

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलंय, आज रितेश सरांचीच होस्टींगमध्ये परीक्षा आहे... खूप अपेक्षा आहेत. जान्हवी, निक्की, अरबाज, वैभवची लायकी दाखवून दिलीच पाहिजे. शिक्षा पाहिजे माफी नको." दुसर्‍या एकाने लिहिलंय, "काल एक वाघ चार कुत्र्यांसोबात एकटा खेळला- कोण सांगा तो वाघ." तिसऱ्याने म्हटलंय, "हा भाऊचा धक्का फक्त प्रोमो मध्येच बघायला चांगला असतो, एपिसोडमध्ये आणि आठवडा भर पण कोणी घाबरत ही नाही आणि त्यांना काहीही फरक पडलेला दिसतही नाही".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणला सेलिब्रिटींचा फुल सपोर्ट, 'गुलिगत किंग'साठी जय दुधाणे, उत्कर्ष शिंदेची खास पोस्ट

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola