Khushi Kapoor Plastic Surgery : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरने गेल्या वर्षी आर्चिज चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीध्ये पदार्पण केलं. सुरुवातीपासून खुशी कपूर ट्रोलर्सच्या निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळालं आहे. तिच्या लूक आणि प्लास्टिक सर्जरीमुळे ती अनेक ट्रोल झाली आहे. आता पुन्हा एकदा याच कारणामुळे खुशी कपूर चर्चेत आली आहे. प्लास्टिक सर्जरीसंदर्भातील कमेंट्सला प्रत्युत्तर देताना तिने मोठा खुलासा केला आहे. यानंतर चाहतेही चकित झाले आहेत.



खुशी कपूरने बॉलिवूड डेब्यु करण्याआधी प्लास्टिक सर्जरी केली असल्याचे दावे करत अनेकदा तिला नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागतो. इंस्टाग्रामवरील एका जुन्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना तिने याबाबत स्पष्टच सांगितलं आहे. खुशीने प्लास्टिक सर्जरी केल्याचा खुलासा केला आहे. खुशीने सांगितलं की, तिने तिच्या ओठ फिलर आणि नोज जॉब केल्याचं मान्य केलं आहे. प्लास्टिक सर्जरीबाबत मोठा खुलासा करत खुशीने दाखवून दिलं आहे की, ती इतर स्टार्सपेक्षा वेगळी आहे आणि या गोष्टी लपवण्याऐवजी ती चाहत्यांसमोर उघडपणे या गोष्टी मांडत आहे.


श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरने गेल्या वर्षी चित्रपट दिग्दर्शिका झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून पदार्पण केलं. 'द आर्चीज' चित्रपट OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून अनेक स्टार किड्सने पदार्पण केलं. पदार्पणापासूनच खुशी तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या प्रामाणिकपणामुळेही चर्चेत आहे.




नुकतेच खुशीने तिच्या प्लास्टिक सर्जरीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. खुशी कपूरने सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. खुशीने खुलासा केला आहे की, इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी सुंदर दिसण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचं कबूल केलं आहे. खुशीने उघडपणे सांगितलं की, तिने लिप फिलर आणि नाकावर शस्रक्रिया केली आहे.  


 






खुशी कपूरने शस्त्रक्रिया केली का?


व्हिडूीओमध्ये खुशी तिच्या आईसोबत एका कार्यक्रमात पोहोचली होती. हा व्हिडीओ तिच्या पहिल्या चित्रपट 'द आर्ची'च्या प्रीमियरच्या फुटेजसह रिलीज करण्यात आला होता, त्यानंतर खुशी तिच्या लूकमुळे चर्चेत राहिली. एका यूजरने खुशीच्या थ्रोबॅक व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं, 'मी प्रामाणिकपणे सांगू शकतो, खुशी पूर्वीसारखीच दिसते. तिने वजन कमी केलं असं वाटतं आहे. यावर उत्तर देताना खुशीने लिप फिलर आणि नाकाची सर्जरी केल्याचं स्वीकारलं आहे. खुशीने कमेंट करत लिहिलं की, "लिप फिलर आणि नोज जॉब. हाहाहा." यानंतर खुशीच्या या प्रामाणिकपणावर चाहते खूश झाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : छोट्या पाहुण्याचं आगमन ते कॅप्टन्सीच्या टास्कमधील राडा, भाऊच्या धक्क्यावर आज कुणाचा नंबर?