Nilesh Sable on Ajit Pawar : अभिनेते निलेश साबळे (Nilesh Sable) यांनी 'चला हवा येऊ द्या'च्या कार्यक्रमात अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मिमिक्री केली होती. त्यानंतर त्यांचे मिमिक्री वाले व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले होते. दरम्यान, आता निलेश साबळे (Nilesh Sable) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बायोपिकबाबत भाष्य केलंय. "अवधुत गुप्ते यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला की, तुमच्यावर बायोपिक बनवायचा असेल तर अभिनेता कोण असावा? यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) उत्तर दिलं होतं की, डॉक्टरांनी (निलेश साबळे) करावा", असा खुलासा निलेश साबळे यांनी एका मुलाखतीत केलाय. 

Continues below advertisement

जवळपास वर्षभरापूर्वी अवधुत गुप्ते यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते की, निलेश साबळे यांचा कार्यक्रम पाहिल्यानंतर मला समजलं की, माझ्याकडून भाषणात याठिकाणी-त्याठिकाणी हे शब्द जास्त वापरले जात आहेत. त्यानंतर मी हे शब्द वापरणेच बंद केले. शिवाय यावेळी निलेश साबळे यांनी अजित पवारांसमोरचं त्यांची मिमिक्री करुन दाखवली होती. यावेळी अजित पवारांनी निलेश साबळेंचं कौतुक देखील केलं होतं. 

पुढे बोलताना निलेश साबळे म्हणाले, आपल्या महाराष्ट्राला विनोदवीरांची आणि साहित्यिकांची खूप मोठी परंपरा आहे. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे असतील. त्यांचे आणि पु.ल. देशपांडे यांचे आपण काही किस्से ऐकतो. आचार्य अत्रेंचे किस्से ऐकतो. मला वाटतं आपण ऐवढे मोठे नाहीत. परंतु आपल्याला जेव्हा राजकीय व्यक्ती विनोद समजून घेऊन शाब्बासकी देतात.. तेव्हा बरं वाटतं. तेव्हा तो कलाकारांना एक आश्रय वाटतो. 

Continues below advertisement

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यामध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. शरद उपाध्ये यांनी निलेश साबळे यांना अहंकारी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर निलेश साबळे यांनी देखील सोशल मीडियावर दोन व्हिडीओ शेअर करुन त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. सध्या निलेश साबळे एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे ते 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम होस्ट करणार नाहीत. त्याच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर हा चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम होस्ट करताना पाहायला मिळणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Yo Yo Honey Singh ची A. R. Rahman आणि आईला अनोखी मानवंदना, दोघांसाठी स्पेशल टॅटू काढला! VIDEO