Yo Yo Honey Singh tattoo for AR Rahman and his Mother : रॅपर आणि संगीत निर्माता यो यो हनी सिंगने प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान यांना मानवंदना दिली आहे.. आपल्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हनी सिंगने सांगितले की, त्याने रहमान यांच्या सन्मानार्थ टॅटू काढला आहे. त्यांनी स्वतःचा टॅटू बनवून घेतानाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. हनी सिंगने रहमान यांना "my lovely living legend " असे संबोधित करत भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल मनापासून आदर व्यक्त केला आहे.
यो यो हनी सिंगने ए. आर. रहमान यांचा ऑटोग्राफ टॅटू स्वरूपात गोंदवला
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, 42 वर्षीय हनी सिंग आपल्या उजव्या खांद्यावर टॅटू बनवून घेताना दिसतोय. तो टॅटू बनवून घेत असतानाच 'तू ही रे' हे रहमान यांचे प्रसिद्ध गाणे गाताना ऐकायला मिळतो. टॅटू बनवून घेताना तो म्हणतो, “हा माझा प्रेमभाव आहे ए. आर. रहमान सरांसाठी. आय लव्ह यू सर. हे तुमच्यासाठी आहे. तुमच्या संगीताने मला आशीर्वाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आज मी एक संगीतकार आहे, त्याचे कारण तुम्हीच आहात. मी तुम्हावर कायम प्रेम करत राहीन.”
हा व्हिडीओ शेअर करताना हनी सिंगने लिहिले, “एकाच रात्रीतला माझा तिसरा टॅटू — माझ्या आवडत्या living legend @arrahman सरांसाठी!! आय लव्ह यू सर, सगळ्याबद्दल धन्यवाद.”
याशिवाय योयो हनी सिंग याने त्याच्या आईचाही टॅटू काढला आहे. आईशी संबंधित टॅटू शेअर करताना हनी सिंग म्हणाला, माझ्या आईची सही.. पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत महिला !! मी तुला प्रेम करतो आई...
यो यो हनी सिंगचा ए. आर. रहमान यांच्यावरील आदर
विशेष म्हणजे, हनी सिंग अनेक वेळा उघडपणे ए. आर. रहमान यांच्यावरील आपला आदर व्यक्त करत आला आहे. तो रहमान यांना ‘संगीताचे देव’ म्हणून संबोधित करतो. 2022 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात रहमान यांच्या पायावर पडतानाचा त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर 2023 मध्ये एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की रहमान यांच्यासोबत काम करणे हे त्याचे स्वप्न आहे. तो म्हणाला होता की, “हे माझं स्वप्न आहे. कदाचित अजून 10-12 वर्षे लागतील ते साध्य व्हायला, पण मी एक गाणं प्रोड्यूस करेन आणि ते गाणं रहमान सर गायले पाहिजे. मला खात्री आहे की त्या गाण्याला ग्रॅमी मिळेल आणि तो पुरस्कार मला रहमान सर स्वतः देतील.”
हनी सिंगने अलीकडेच ‘तेरी यादें’ हे नवीन म्युझिक व्हिडीओ रिलीज केले असून त्यात अभिनेत्री नरगिस फाखरी आणि आंतरराष्ट्रीय कलाकार ग्रिनी झळकत आहेत. हे गाणं ‘ग्लोरी’ या त्याच्या अल्बममधील आहे, ज्यातून त्याने संगीत निर्मात्याच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे. या अल्बममध्ये 10 वेगवेगळ्या भाषांतील गाणी आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
40 रोट्या खायचो, अर्धा लिटर दूध प्यायचो; तरीही वजन वाढत नव्हतं, अभिनेता जयदीप अहलावत काय म्हणाला?
