Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात आज रंगणार शेवटची चावडी; या स्पर्धकाने जिंकलं 'Ticket To Finale'
Bigg Boss Marathi 4 : मराठी बिग बॉस सीझन 4 ची आज शेवटची चावडी रंगणार आहे.
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी सीझन 4 (Bigg Boss Marathi 4) चा महाअंतिम सोहळा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 8 जानेवारी 2023 रोजी रंगणार आहे. मराठी बिग बॉस सीझन 4 हा सीझन अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. कधी या घरातील स्पर्धकांच्या वादाने तर कधी टास्कमधील ट्विस्टने. यामध्येच बिग बॉसच्या घरातील शो चे होस्ट महेश मांजरेकर यांची चावडी पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहात असतो. आज याच चावडीचा या सीझनमधील शेवटचा आठवडा असणार आहे. त्यामुळे या आठवड्यात महेश मांजरेकर कोणत्या स्पर्धकाची शाळा घेणार आणि कोणाचं कौतुक करणार याबद्दल बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
बिग बॉस सीझन 4 चा फिनाले जसजसा जवळ येतोय तितकीच स्पर्धकांमध्ये ट्रॉफी मिळविण्यसाठीची धडपड पाहायला मिळतेय. नुकताच घरात तिकीट टू फिनाले (Ticket To Finale) हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये अनेक स्पर्धकांनी जीव ओतून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न केला. या टास्कमध्ये अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) तिकीट टू फिनाले जिंकून थेट फिनालेमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील अपूर्वा नेमळेकर सीझन 4 ची पहिली फायनलिस्ट ठरली आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
घरातील 'या' सदस्यांवर नॉमिनेशनची तलवार
घरात नुकत्याच झालेल्या नॉमिनेशनमध्ये प्रसाद जवादे, अमृता धोंगडे आणि राखी सावंत हे तीन सदस्य नॉमिनेशनमध्ये आहेत. यापैकी या आठवड्यात कोणता सदस्य फिनालेला मुकणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. सध्या अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अक्षय केळकर आणि आरोह वेलणकर या स्पर्धकांनी फिनालेमध्ये एन्ट्री केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :