Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात शनिवारपासून विकेण्डचा डाव रंगत आहे. महेश मांजरेकरांनी चावडीवर सर्वच स्पर्धकांची शाळा घेतली आहे. महेश मांजरेकर वारंवार सूचना देत असून स्पर्धक त्या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे भागात मांजरेकरांनी स्पर्धकांसोबत अबोला धरला होता. पण स्पर्धकांनी पुन्हा अशी चूक होऊ देणार नाही असे आश्वासन मांजरेकरांना दिले. आजच्या भागात घरातील एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. आज बिग बॉसच्या घरात रेशम टिपणीस आणि मेघा धाडे प्रमुख पाहूणे म्हणून येणार आहे. 


या आठवड्याच्या नॉमिनेनश प्रक्रियेत मीनल शहा, विकास पाटील, आदिश वैद्य, संतोष चौधरी उर्फ दादूस हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. या स्पर्धकांमधून कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. संतोष चौधरी उर्फ दादूस या आठवड्याचे बिग बॉसच्या घरातील कॅप्टनदेखील आहेत. कालच्या भागात महेश मांजरेकर एकीकडे रागवताना दिसले तर दुसरीकडे टास्कमधील कामगिरीवर कौतुक करतानादेखील दिसले. 


Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घराचा आजी घेणार आज निरोप, घरातील सदस्यांना अश्रू अनावर


आजच्या भागात बिग बॉसच्या घरात रेशम टिपणीस आणि मेघा धाडे प्रमुख पाहूणे म्हणून येणार आहेत. रेशम आणि मेघा आधीच्या पर्वात विरुद्ध गटात असून सतत भांडताना दिसून यायचे. त्यामुळे बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील सदस्यांना या दोघी काय सल्ले देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आज बिग बॉसच्या घरातील एक सदस्य निरोप घेणार असल्याने घरातील सगळ्यात सदस्यांच्या डोळ्यात पाणी आहे. तर चाहते स्पर्धकांना अतरंगी डिमांड देताना दिसून येणार आहे. प्रोमोमध्ये चाहत्यांनी दिलेल्या अतरंगी डिमांडप्रमाणे उत्कर्ष शिंदे आणि सोनाली पाटील डान्स करताना दिसून आले आहेत. तर कोणत्या स्पर्धकाने कोणाची चुगली कोणाकडे केली आहे तेदेखील आजच्या भागात कळणार आहे. 


Dadasaheb Phalke Award: सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार; पण, एका गोष्टीचं दुःख : रजनीकांत


बिग बॉसच्या घरात या आठवड्यात अनेक रंगतदार टास्क झाले. घरात सर्वांच्या लाडक्या आजीचे आगमन झाले होते. आजी घरातील सदस्यांना ओरडली तर आजीने तिच्या लाडक्या नातवडांना खाऊदेखील दिला. आजी घराचा निरोप घेताना घरातील सर्व सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. काल चावडीवर मांजरेकरांनी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली होती. त्यामुळे येणाऱ्या भागात स्पर्धक मांजरेकरांच्या सूचनांचे पालन करताना दिसून येऊ शकतात. आज घरातील कोणता सदस्य घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.


India Vs Pakistan मॅचसाठी उत्सुक श्रद्धा कपूर, गोलंदाज वरुण चक्रवर्तीकडून मोठ्या आशा