Dadasaheb Phalke Award: साउथ सुपरस्टार रजनीकांत यांनी आज 24 ऑक्टोबर रोजी चेन्नईतील त्यांच्या घराबाहेर माध्यमांची भेट घेतली. त्यांनी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकल्याबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. या भेटीत या सुपरस्टारने सांगितले की, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळण्याची मला अपेक्षा नव्हती. त्यांना हा पुरस्कार स्वीकारताना पाहण्यासाठी त्यांचे गुरू केबी (के बालचंदर) सर हयात नाहीत याचे मला दुःख आहे, असेही त्यांनी सांगितले.


माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मी खूप आनंदी आहे की मी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. मला हा पुरस्कार मिळेल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. जेव्हा मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा मला वाईट वाटले की, केबी सर (के बालाचंदर) आपल्यात नाही." मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत उद्या दिल्लीत होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणार आहेत. एप्रिल 2021 मध्ये, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली की सुपरस्टार रजनीकांत यांना गेल्या चार दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, कोविड - 19 च्या साथीमुळे पुरस्कार सोहळ्याला विलंब झाला.






रजनीकांत पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित
भारतातील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक, रजनीकांत यांना भारत सरकारने 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले आहे. रजनीकांत यांनी अपूर्व रागंगल या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच्या अनेक हिट चित्रपटांपैकी 'बाशा', 'शिवाजी' आणि 'एंथिरन' सारखे चित्रपट आहेत. तो त्याच्या चाहत्यांमध्ये थलाईवर (नेता) म्हणून ओळखला जातो.


जाणून घ्या पहिल्यांदा कोणाला हा पुरस्कार देण्यात आला
दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतातील चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह तो दिला जातो. हा पुरस्कार अभिनेत्री देविका राणीला सर्वप्रथम देण्यात आला. त्याचवेळी अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, चित्रपट निर्माते के. विश्वनाथ आणि मनोज कुमार या दिग्गजांचाही यात समावेश आहे.