India vs Pakistan : आजपासून टी -20 विश्वचषकाचा थरार सुरु होतोय ते भारत आणि पाकिस्तान सामन्यापासून. बॉलिवूडमध्येदेखील यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज रात्री रंगणाऱ्या सामन्यासाठी बॉलिवूड अभिनेत्रीदेखील प्रचंड उत्साहात आहे. श्रद्धा कपूर तिच्या कुटुंबियांसोबत आजच्या सामन्याचा आनंद घेणार आहे. तसेच मॅच दरम्यान ती भारतीय खेळांडूना चिअरदेखील करणार आहे. तिला भारतीय गोलंदाज वरुण चक्रवर्तीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 


भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला
श्रद्धा कपूरने कधीही क्रिकेट खेळलेलं नाही. पण तिला क्रिकेटचे सामने बघायला आवडतात. प्रत्येक क्रिकेटप्रेमीसारखे श्रद्धा कपूरलादेखील भारत-पाकिस्तानचा सामना बघायला आवडतो. भारताने वनडेपासून टी 20 पर्यंत मागील 12 सामन्यात पाकिस्तानला सलग हरवले आहे. तीन वर्षांनंतर आज पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानचा सामना रंगणार आहे. या सामन्यावर श्रद्धा कपूर म्हणते, "मला आशा आहे की, आजच्या सामन्यात भारताचाच विजय होईल. भारत पाकिस्तानला पुन्हा एकदा हरवेल."


गोलंदाज वरुण चक्रवर्ती कडून आहे आशा
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे क्रिकेटर श्रद्धा कपूरला जास्त आवडतात. श्रद्धा कपूर म्हणते, "गोलंदाज वरुण चक्रवर्ती आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. वरुणला जर संधी मिळाली तर तो नक्कीच त्या संधीचे सोने करेल आणि भारताचे नाव मोठे करेल". 


श्रद्धा कपूरच्या वडिलांनादेखील क्रिकेट आवडतं. शाळा-कॉलेजमध्ये असताना ते संघाने कॅप्टनदेखील असायचे. त्यावर श्रद्धा कपूर म्हणाली,"माझे वडील अभिनेते नसते तर क्रिकेटर नक्की झाले असते". त्यामुळेच श्रद्धा कपूर तिच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत आजचा सामना बघणार आहे. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना कधी आणि कुठे होणार?
आयसीसी टी -20 विश्वचषकात, भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवार, 24 ऑक्टोबर रोजी आमनेसामने येतील. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. सामन्याची नाणेफेक सायंकाळी 7 वाजता होणार आहे.


सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे बघायचे?
तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+Hotstar) वर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. याशिवाय https://marathi.abplive.com//amp  वर तुम्हाला सामन्याचे लाईव्ह अपडेट्स मिळतील.


लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहू शकतो?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहू शकाल. इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त, हे इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील पाहिले जाऊ शकते.