Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामधून गायत्री दातार बाहेर
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरातील टॉप 8 स्पर्धकांमधून गायत्री दातार बाहेर पडली आहे.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नव्या सदस्यांची एन्ट्री झाली आहे. स्नेहा, आदिश आणि तृप्तीताई या सदस्यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. हे नवे सदस्य बिग बॉसच्या घरात हुकूमशहा बनले होते. हा संपूर्ण आठवडा या हुकुमशहांनी चांगलच गाजवला मग तो एलिमनेशन टास्क असो, साप्ताहिक कार्य असो वा कॅप्टन्सी टास्क. पण या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून गायत्री दातार बाहेर पडली आहे.
View this post on Instagram
बिग बॉस मराठीच्या घराचे शेवटचे कॅप्टनपद मिळवण्याचा मान मीनलला मिळाला होता. तर नॉमिनेशन कार्यात गायत्री दातार, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील नॉमिनेट झाले होते. यात मीरा जगन्नाथ सेफ असल्याचे महेश मांजरेकरांनी कालच्या भागात घोषित केले होते. उत्कर्ष स्नेहामध्ये शाब्दिक चकमकदेखील झाली होती.
View this post on Instagram
उत्कर्ष आणि जयने यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण करत लावणी सादर केली. इतक्या दिवसांच्या प्रवासानंतर कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये आल्या ज्यामध्ये गायत्री दातारला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.
संबंधित बातम्या
Sidharth Shukla Birth Anniversary : शहनाज गिलची भावनिक पोस्ट, चाहते झाले इमोशनल
GoodBye 2021 : 'सरदार उधम'पासून 'रश्मी रॉकेट'पर्यंत वर्षभरात 'या' चित्रपटांनी केले मनोरंजन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
