Urvashi Dholakia Car Accident : 'बिग बॉस' फेम उर्वशी ढोलकियाच्या कारला स्कूल बसची धडक; थोडक्यात बचावला जीव
Bigg Boss 6 : 'बिग बॉस 6'ची विजेती उर्वशी ढोलकिया एका अपघातातून थोडक्यात बचावली आहे.
Urvashi Dholakia Car Accident : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये उर्वशी ढोलकियाचं (Urvashi Dholakia) नाव घेतलं जातं. उर्वशी नुकतीच एका अपघातातून थोडक्यात बचावली आहे. उर्वशीच्या कारचा भीषण अपघात झाला. तिच्या कारला एका स्कूल बसने धडक दिली आहे. या अपघातात अभिनेत्रीला गंभीर दुखापत झालेली नाही. पण उर्वशीच्या कारचं मात्र नुकसान झालं आहे. उर्वशी ढोलकिया ही 'बिग बॉस 6'ची (Bigg Boss 6) विजेती आहे.
उर्वशी ढोलकियाचा अपघात कसा झाला?
एनआयने दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी ढोलकियाचा अपघात शनिवारी झाला आहे. एका कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी उर्वशी मुंबईतील मीरा रोड येथील एका सेटवर जात असताना हा अपघात घडला आहे. काशिमीरा भागांत एका स्कूल बसने उर्वशीच्या कारला धडक दिली आहे. या अपघातात अभिनेत्री थोडक्यात बचावली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्कूल बस असल्याने विद्यार्थ्यांचा विचार करता उर्वशीने कोणतीही कायदेशीर तक्रार नोंदवलेली नाही.
View this post on Instagram
उर्वशी ढोलकियाचा गंभीर दुखापत झालेली नाही. पण डॉक्टरांनी तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. उर्वशीच्या अपघाताची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पण गंभीर दुखापत झाली नसल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस'च्या सहाव्या पर्वाची विजेती उर्वशी ढोलकिया ठरली होती. अनेक मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. यात 'कसौटी जिंदगी की', 'नागिन 6' आणि 'चंद्रकांता' सारख्या लोकप्रिय मालिकांचा समावेश आहे. 'कसौटी जिंदगी की' या उर्वशीच्या मालिकेचा चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
उर्वशीचा संघर्ष
उर्वशी आज एक लोकप्रिय अभिनेत्री असली तरी या प्रवासादरम्यान तिला खूप संघर्ष करावा लागला आहे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत तिने साकारलेलं कोमोलिका हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. उर्वशीने अनेक बी ग्रेड सिनेमांतदेखील काम केलं आहे. या सिनेमांतील बोल्ड सीन्स तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले नाहीत. त्यानंतर तिने बी ग्रेड सिनेमांत काम करणं सोडलं. उर्वशीने नुकतचं 'नागिन 6' या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या खलनायिकेची भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :