(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss 18 Salman Khan : बिग बॉस 18 मध्ये यंदा जरा हटके थीम, भाईजानने केला प्रोमो शूट
Bigg Boss 18 Salman Khan : यंदाचा बिग बॉसचा सीझन वेगळा असणार आहे. यंदाच्या सीझनची थीम समोर आली आहे. सलमान खानने नुकताच प्रोमो शूट केला.
Bigg Boss 18 Salman Khan : भारतीय टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि वादांमुळे चर्चेत असणारा बिग बॉस मराठी हा रिएल्टी शो आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा बिग बॉसचा 18 वा सीझन आहे. याआधीचे 17 सीझन चांगलेच लोकप्रिय झाले होते. भाईजान सलमान खान (Salman Khan) हा बिग बॉस होस्ट करणार नसल्याचे म्हटले जात होते. पण, सलमान खानने या चर्चांना पूर्णविराम लावला. यंदाचा बिग बॉसचा सीझन वेगळा असणार आहे. यंदाच्या सीझनची थीम समोर आली आहे. सलमान खानने नुकताच प्रोमो शूट केला.
इंडिया टुडे मधील एका वृत्तानुसार, बिग बॉस 18 ची थीम भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याभोवती फिरते. एका सूत्राने सांगितले की, सलमान खानने प्रोमोच्या शूटिंगसाठी खूप चांगला वेळ दिला आणि प्रोमोमध्ये तो या वेगवेगळ्या टाइमलाइनवर चर्चा करताना दिसणार आहे. या शोचा प्रोमो सप्टेंबरच्या अखेरीस रिलीज होण्याची शक्यता आहे. याशिवाय, घरामध्ये एक नवीन डिझाइन देखील थीमनुसार असणार आहे. या सीझनमध्ये मागील सीझनमधील स्पर्धक घरात येणार का, या सीझनमध्ये काय ड्रामा होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
Bhai about his rib injury, says 2 pasliyan tooti hain 🥺 Plz take care #SalmanKhan bhai ❤️ #BiggBoss18 pic.twitter.com/sGn75122ig
— Nav Kandola (@SalmaniacNav) September 5, 2024
कोणते सेलेब्स असणार स्पर्धक?
या वर्षी बिग बॉसच्या घरात कोणते सदस्य असणार याची चर्चा सुरू आहे. यामध्ये अलीशा पनवार, रीम शेख, शाहीर शेख, सुरभी ज्योती आणि समीरा रेड्डी या नावांची जोरदार चर्चा आहे. तर, मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या नावाचीदेखील चर्चा आहे. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नवीन सीझन ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कलर्स टीव्हीवर प्रसारित होण्याची शक्यता आहे.
सलमान खानचे आगामी प्रोजेक्ट्स...
बिग बॉस 18 च्या होस्टिंगसोबतच सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटांमध्येही व्यस्त आहे. तो लवकरच ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित सिकंदर या ॲक्शन-पॅक थ्रिलरमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. त्याशिवाय, साजिद नाडियादवालाच्या 'किक-2' मध्ये ग्रे शेडमध्ये दिसणार आहे. याशिवाय सलमान हा शाहरुख खानसोबत YRF च्या बिग स्पाय थ्रिलर 'टायगर वर्सेस पठाण'मध्ये पडद्यावर दिसणार आहे. ॲक्शन चित्रपटात त्यांची पात्रं एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत.