Bigg Boss 18 : पहिल्या आठवड्यात No Eviction, तरीही बिग बॉसच्या घराबाहेर जाणार 'हा' सदस्य; जाणून घ्या कारण
Bigg Boss Season 18 : सलमान खानची बिग बॉस 18 ची शूटींग सध्या थांबवण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर भाईजानने शूटींग थांबवलं आहे.
Bigg Boss 18 First Eviction : बिग बॉस 18 नवीन सीझन सध्या खूप चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. सलमान खानच्या दमदार ग्रँड प्रीमियरपासूनच याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या आठवड्यात बिग बॉस प्रेमींसाठी गूड न्यूज आहे. बिग बॉस सीझन 18 च्या पहिल्या आठवड्यात कोणाचं एलिमिनेशन होणार नाही. असं असलं तरी एका सदस्याला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागणार आहे. बिग बॉस 18 बाबतची लेटेस्ट अपडेट जाणून घ्या.
बिग बॉस 18 च्या पहिल्या आठवड्यात No Eviction
बिग बॉस 18 मधील ट्वीस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहेत. चाहत्यांसाठी एक चांगली बातमी म्हणजे या आठवड्यामध्ये नॉमिनेट सदस्यांपैकी कोणताही सदस्य घराबाहेर जाणार नाही. या आठवड्यात एविक्शन होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात एविक्शन होणार नसलं तरीही या आठवड्यात एका सदस्याला घराबाहेर जावं लागणार आहे. बिग बॉस 18 बद्दल अपडेट शेअर करणाऱ्या एका एक्स मीडिया अकाऊंटवर ही माहिती देण्यात आली आहे.
पहिल्या आठवड्यात बेघर होणार 'हा' सदस्य
बिग बॉस 18 शी संबंधित अपडेट्स शेअर करणाऱ्या X अकाऊंटने पोस्टमध्ये नवीन माहिती शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, बिग बॉस 18 च्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही सदस्याला घराबाहेर काढलं जाणार नाही, पण 'गधराज' घराबाहेर जाणार आहे. बिग बॉस 18 मधून स्पर्धक क्रमांक 19 बाहेर पडणार आहे. त्यामुळे यापुढे गधराज आता बिग बॉसच्या घरात दिसणार नाही.
No Eviction in the first week of #BiggBoss18
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 12, 2024
However, Gadhraj 🫏 is been out of the house.
बिग बॉस 18 चा नवीन प्रोमो
बिग बॉस 18 च्या 'वीकेंड का वार'चा प्रोमोही सोशल मीडियावर समोर आला आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, सलमान खान बिग बॉसच्या घरात दिसत आहे आणि यावेळी त्याच्यासोबत तृप्ती डिमरी, राजकुमार राव, मल्लिका शेरावत असे अनेक बॉलिवूड स्टार्सही त्याच्यासोबत दिसत आहेत. दरम्यान, सलमान खानचे खास मित्र बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडू हत्या करण्यात आल्यानंतर सलमान खानने शोचे पुढील शूटिंग थांबवलं आहे. भाईजान शूटिंगवर कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :