(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss 18 : बिग बॉस प्रेमींची फजिती! सलमान खानच्या रिॲलिटी शोबद्दल निया म्हणाली, 'मला माफ करा...'
Bigg Boss New Season : अभिनेत्री निया शर्माने सलमान खानचा शो बिग बॉस 18 मध्ये प्रवेश करणार आहे की नाही यावर तिने अखेर खुलासा केला आहे.
Bigg Boss 18 : बिग बॉसच्या यंदाच्या अठराव्या सीझनची घोषणा होण्याआधीपासूनच हा सीझन चर्चेत आहे. बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार हे, जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फारच आतुर झालेले पाहायला मिळत आहे. बिग बॉस 18 मध्ये कोणते स्पर्धक येणार यासाठी बरेच तर्कवितर्क लावण्यात आले आहे. तर काही स्पर्धकांची नावंही समोर आली आहे. बिग बॉस 18 मध्ये दाखल होणारी पहिली स्पर्धक म्हणून अभिनेत्री निया शर्माचं नाव समोर आलं होतं. आता निया शर्माने सलमान खानचा शो बिग बॉस 18 मध्ये प्रवेश करणार आहे की नाही यावर अखेर खुलासा केला आहे.
निया शर्माचं बिग बॉस 18 बद्दल प्रतिक्रिया
अभिनेत्री निया शर्मा रविवारी चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. निया शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने ती यंदाच्या बिग बॉस सीझनचा भाग नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे निया शर्माने इंस्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे की, बिग बॉसमध्ये जाणार नाही. नियाने सलमान खानच्या शोचा भाग नसल्याची घोषणा केल्यानंतर चाहत्यांची आणि प्रेक्षकांची माफी मागितली.
निया शर्मा म्हणाली, 'मला माफ करा...'
अभिनेत्री निया शर्माने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिलंय, "चाहते आणि हितचिंतकांसाठी माझ्याकडे एक निराशाजनक बातमी आहे. माफ करा. चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा, प्रेम आणि विलक्षण प्रसिद्धीमुळे मी भारावून गेले आहे. मला किमान एकदा तरी बिग बॉसच्या घरात जावं असं वाटलं आणि गेल्या 14 वर्षात मी काय कमावलं आहे, याची जाणीव करून दिली. गेल्या काही दिवसांत मिळालेली प्रसिद्धी आणि चर्चेत राहणं मला आवडलं नाही, असं मी म्हणू शकत नाही, पण कृपया मला दोष देऊ नका. मी ती नव्हती." यावर निया शर्मा बिग बॉसच्या घरात जाणार नसल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
आपके साथ प्रँक हुआ हैं...
दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'खतरों के खिलाडी' शोच्या ग्रँड फिनालेमध्ये निया शर्मा बिग बॉस 18 मध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानंतर ही चर्चा सुरु झाली होती. अभिनेत्रीच्या जवळच्या एका सूत्राने डीएनएला दिलेल्या माहितीनुसार, निया शर्मा बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं होतं. आत 'खतरों के खिलाडी 14 शोचे होस्ट रोहित शेट्टीने केलेली घोषणा एक प्रँक म्हणजे चाहत्यांची फजिती करण्यासाठी होता, हे स्पष्ट झालं आहे.
View this post on Instagram
आज 'बिग बॉस 18' चा ग्रँड प्रीमियर
सलमान खानचा चर्चित रियलिटी शो 'बिग बॉस 18' चा आज ग्रँड प्रीमियर आहे. ग्रँड प्रीमियरने या शोला सुरुवात होणार आहे. 'बिग बॉस 18' आजपासून सुरू होत आहे. या शोचा भव्य प्रीमियर आज होणार आहे. बिग बॉस 18 ग्रँड प्रीमियर नाईटच्या आधी कलर्स चॅनलच्या इन्स्टाग्राम हँडलवर एकामागून एक अनेक प्रोमो रिलीज केले जात आहेत. यंदाच्या 'बिग बॉस'ची थीम 'समय का तांडव' आहे. हा शो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या थीमवर आधारित असेल. आजपासून म्हणजेच रविवारपासून शोचा अठरावा हंगाम सुरू होत आहे.