(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss 18 : बिग बॉस 18 मध्ये नवा ट्विस्ट, अविनाश मिश्राची घरवापसी; खास Power मुळे सदस्यांवर येणार नवं संकट
Bigg Boss Season 18 : बिग बॉस 18 मध्ये अविनाश मिश्राला घराबाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, तो पुन्हा बिग बॉसच्या घरात परतणार आहे.
Bigg Boss Season 18 : बिग बॉस 18 मध्ये दिवसेंदिवस नवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अविनाश मिश्राला घरातील सदस्यांनी व्होट करत घराबाहेर काढलं. आता बिग बॉस सीझन 18 च्या नवीन एपिसोडमध्ये एलिमिनेट झालेला अविनाश मिश्रा बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा घरवापसी करताना दिसणार आहे. एलिमेनेट झालेला अविनाश याने बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री करताच धमाका केला आहे. बिग बॉसने घरवापसी केलेल्या अविनाशला खास पॉवर दिली आहे. यामध्ये घरातील सदस्यांचं राशन त्याच्याकडे असणार आहे.
एलिमेनेट झालेल्या सदस्याचा बिग बॉसच्या घरात धमाका
गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून तीन सदस्य घराबाहेर गेले, त्यातील एक सदस्य आता घरवापसी करताना दिसणार आहे. अविनाश मिश्रा बिग बॉसच्या घरात परतणार असून बिग बॉस त्याला पॉवर देणार आहे. यामध्ये घरातील सदस्यांचं राशन कंट्रोल अविनाशच्या हातात असेल. यामुळे आता बिग बॉसच्या घरात नवीन राडा पाहायला मिळणार असून यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होताना दिसणार आहे.
अविनाश मिश्रा बिग बॉस 18 मध्ये परतणार
बिग बॉस 18 च्या प्रोमोमध्ये चुम दरांग आणि अविनाश मिश्रा यांच्यातील कडाक्याच्या भांडणानंतर अविनाश मिश्राला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अविनाश मिश्राला घराबाहेर जाताना पाहून एलिस कौशिक आणि ईशा सिंह यांना रडू अनावर झालं. एकीकडे ईशाही अविनाशसोबत घराबाहेर जाण्याचा हट्ट केला. तर, रडून-रडून एलिस कौशिकची तब्येत अचानक बिघडल्याने तिला तातडीने वैद्यकीय कक्षात उपचारासाठी नेण्यात आलं. ज्यानंतर आता अविनाश शोमध्ये परतणार असल्याची बातमी समोर आली आहे आणि यासोबतच बिग बॉसने त्याला एक खास पावरही दिली आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :