Bigg Boss 17 : मुनव्वर फारुकीने आयशा खानला नॅशनल टीव्हीवर केलं प्रपोज; नेटकरी म्हणाले,"भाऊ मास्टरमाइंड आहे"
Munawar Faruqui Propose Ayesha Khan : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) आयशा खानला (Ayesha Khan) प्रपोज केलं आहे.
Bigg Boss 17 Munawar Faruqui Propose Ayesha Khan : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. पण सध्या या कार्यक्रम एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. 'बिग बॉस 17'च्या घरात मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) आयशा खानला (Ayesha Khan) प्रपोज केलं आहे.
'बिग बॉस 17'च्या घरात काही दिवसांपूर्वी आयशा खानची (Ayesha Khan) धमाकेदार एन्ट्री झाली आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाल्यानंतर आयशाने मुनव्वरवर अनेक गंभीर आरोप केले. मुनव्वरने आयशाने केलेले आरोप मान्य केल्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळाली. दरम्यान मुनव्वरने नॅशनल टीव्हीवर आयशा खानला प्रपोज केलं आहे.
मुनव्वर फारुकीने आयशा खानला केलं प्रपोज
मीडिया रिपोर्टनुसार, विनोदवीर मुनव्वर फारुकीने आयशा खानला प्रपोज केलं आहे. 'बिग बॉस'च्या घरातील गार्डन एरियामध्ये मुनव्वर फारुकी आयशा खानला म्हणत आहे,"तुझं कुटुंब माझा स्वीकार करेल का? तुझं आणि माझं भविष्य कसं असेल? आपलं चांगलं होऊ देत".
आयशाआधी मुनव्वर नाजिला सीताशीला डेट करत होता. दोन वर्षांपासून ते रिलेशनमध्ये होते. 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करण्याआधी मुनव्वर अनेकदा आयशाबद्दल बोलताना दिसत आहे. पण आयशा खानच्या एन्ट्रीनंतर त्याने नाजिलासोबत ब्रेकअप केला.
'बिग बॉस 17' या कार्यक्रमातील स्पर्धक वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. ईशा मालवीयनंतर मुनव्वर फारुकीचं वैयक्तिक आयुष्य जगासमोर आलं आहे. या कार्यक्रमात मुनव्वरने नाजिला सीताशीला आपली गर्लफ्रेंड बनवलं आहे. दरम्यान आयशा खानची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात मुनव्वर आणि आयशामध्ये चांगलच नाट्य पाहायला मिळालं. मुनव्वरला अश्रू अनावर झाले होते. नाजिलाने इंस्टा लाईव्हच्या माध्यमातून मुनव्वरसोबत ब्रेकअप केला होता.
🚨 BREAKING! Nazila Sitaishi said whatever Munawar said in his explanation is untrue. He said a bunch of lies. This is not only about Ayesha Khan, there are other women also involved. Means he multi-dated and cheated. She doesn't want to associate anymore with Munawar. She was in… pic.twitter.com/a8N6DN22qY
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 18, 2023
नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
मुनव्वर फारुकीने आयशला प्रपोज केल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता नाजिलाचं कसं होणार? भावा हे काय चाललंय? मुनव्वर भाऊ मास्टरमाइंड आहे, मुनव्वर आणि आयशा दोघेही फेक आहेत, मुनव्वर आता घाबरला आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या