Bigg Boss 15 : बिग बॉसच्या मंचावर आज Salman Khan आणि Rani Mukerji एकत्र, मोठी धमाल होणार
Rani Mukerji And Salman Khan In Bigg Boss 15 : राणी मुखर्जी बिग बॉसच्या मंचावर तिच्या आगामी बंटी और बबली सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती.
Bigg Boss 15 Weekend Ka Vaar : सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉस 15 च्या विकेण्डच्या वारी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या आगामी 'बंटी और बबली 2' या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. राणी मुखर्जी आणि सलमान खान या शोच्या दरम्यान धमाल करताना दिसून येणार आहेत. या दोघांची मैत्री खास आहे. अनेक वर्षांनंतर दोघे एकाच मंचावर एकत्र आल्याने 'बिग बॉस 15'चा आजचा भाग अधिक मनोरंजनात्मक होणार आहे. प्रोमोमध्ये सलमान खान राणीला अनेक मजेदार प्रश्न विचारताना दिसून येत आहे.
'तेरी चुनरिया' गाण्यावर सलमान-राणीने केले नृत्य
प्रोमोमध्ये सलमान खान आणि राणी मुखर्जी त्यांच्या 'हॅलो ब्रदर' सिनेमातील 'तेरी चुनरिया' गाण्यावर नृत्य करताना दिसून येत आहेत. या नृत्यामुळे दोघांमधील केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. त्यानंतर सलमान खान राणी मुखर्जीच्या कानात हेडफोन लावतो आणि तिला प्रश्न विचारतो. राणीला लिप रीडिंगद्वारे सलमानच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. राणी देत असलेले उत्तर ऐकून सलमानला हसू अनावर झाले आहे.
View this post on Instagram
आजच्या भागात राणी सलमानसोबत बिग बॉसच्या मंचावर थिरकताना दिसूण येणार आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ बिग बॉसच्या घरात जाऊन घरातील स्पर्धकांना टास्क देताना दिसून येणार आहेत. सिद्धांत घरातील सदस्यांना एकमेकांबद्दलचे मत व्यक्त करण्यास सांगतो. सिद्धांत विचारतो, "घरात हसणारा कोण?" त्यावर नेहा भसीन करण कुंद्राचे नाव घेते. दरम्यान उमर रियाज आणि प्रतिकमध्ये वाद होणार आहे.
View this post on Instagram
'बंटी और बबली- 2' हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वरुण वी. शर्मा यांनी केली आहे. वरूण यांनी 'टायगर जिंदा है' आणि 'सुलतान' या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले. 'बंटी और बबली 2' या चित्रपटातील बंटी ही भूमिका सैफ अली खान साकारणार असून बबली ही भूमिका राणी मुखर्जी साकारणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha