एक्स्प्लोर

Sidharth Shukla Death : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं अकाली निधन; मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं अकाली निधन झालं. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होईल. (Sidharth Shukla Death).

मुंबई : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होईल.  त्याच्या अकाली जाण्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

बिग बॉसच्या तेराव्या सीझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधूमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. सिद्धार्थच्या निधनाची बातमी मिळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिद्धार्थ शुक्लासोबत बालिका वधू या मालिकेत काम केलेल्या अभिनेत्री अविका गौर म्हणते, "सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीने आपल्याला जबर धक्का बसला असून अद्याप त्यावर विश्वास बसत नाही. तो एक व्यक्ती म्हणून खूप चांगला होता. त्याच्या आत्म्याला शांती लाभो."

सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या अकाली निधनाने आपल्याला धक्का बसल्याचं अभिनेता रितेश देशमुखने म्हटलं आहे. सिद्धार्थवर लाखो चाहते प्रेम करायचे, त्याच्या आत्म्याला शांती लाभो असंही रितेश देशमुखने म्हटलं आहे. 

 

अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाली की, सिद्धार्थ तू कायम स्मरणात राहशील. माझ्या भावना सिद्धार्थच्या कुटुंबासोबत आहेत. 

 

अभिनेता अक्षय कुमार यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, "सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची वाईट बातमी समजली. मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो पण अशा प्रकारचा हुशार व्यक्ती आपल्यातून निघून जाणं हे धक्कादायक आहे."

 

सिद्धार्थ शुक्लासोबत अनेक वर्षे काम केलेला त्याचा मित्र मनोज मुंतशीर म्हणतो की, आम्ही दोघांनी अनेक वर्षे एकत्रित काम केलं. इतका मोठा होऊनही त्याला त्याच्या स्टारडमचा गर्व नव्हता, त्याचे पाय नेहमी जमिनीवर असायचे. आपण टीव्हीवरील एक मोठं नाव गमावलंय.

बिंदू दारा सिंह म्हणतात की, सिद्धार्थचा मृत्यू ही गोष्ट अजूनही पटत नाही. त्याच्या जाण्याने बॉलिवूडचे मोठं नुकसान झालं आहे. सुनिल ग्रोवरनेही सिद्धार्थच्या अचानक निघून जाण्यानं आपल्याला दु:ख झाल्याचं सांगितलं आहे.

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Lock up 2 Romance: 'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
Vachan Dile Tu Mala Star Pravah Serial Track: स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; पद्माचं लग्न रोखण्यासाठी शौर्य-ऊर्जाचा प्लॅन, वेशांतर करुन...
स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; पद्माचं लग्न रोखण्यासाठी शौर्य-ऊर्जाचा प्लॅन, वेशांतर करुन...
Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा
Veen Doghantli Hi Tutena Marathi Serial Track: 'I Love You राजवाडे...'; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश
'I Love You राजवाडे...'; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
Embed widget