एक्स्प्लोर
मालिका मिळत नसल्याने 'भाभीजी...' फेम शिल्पा शिंदेचा निर्णय
मुंबई : 'भाभाजी घर पर है' मालिकेतील पहिली अंगुरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे मागील काही काळापासून टीव्हीवरुन जणू गायबच झाली आहे. छोट्या पदड्यावर तिला काम मिळत नाही. इतकंच नाही तर टीव्ही इंडस्ट्रीने तिच्यावर बहिष्कार टाकल्याचीही चर्चा आहे. यामुळे आता शिल्पाला नवं पाऊल उचलावं लागत आहे.
'पटेल की पंजाबी शादी' चित्रपटात शिल्पा शिंदे ऋषी कपूर यांच्यासोबत आयटम नंबर करत आहे. सिनेमात परेश रावल आणि वीर दास दिसणार आहे. यात शिल्पाची छोटीशी भूमिकाही असेल. हे गाणं लवकरच मुंबईत लॉन्च होणार आहे.
शिल्पा शिंदेच्या या आयटम नंबरचं नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्यने केलं आहे, तर बेबी डॉल फेम कनिका कपूरने हे गाणं गायलं आहे. ऋषी कपूर आणि परेश राव एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चित्रपटात ऋषी कपूर पंजाबी वडील आणि परेश रावल गुजराती वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांची मुलं अर्थात वीर दास आणि पायल घोष यांचं सूत जुळतं. त्यांचं प्रेमाचा शेवट कसा होतो, हे मजेशीर अंदाजात सादर केलं आहे.
'भाभीजी घर पर है' ही मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय शिल्पा शिंदेने घेतला होता. यानंतर निर्माते आणि शिल्पा यांच्यातील वाद वाढला होता. या वादानंतर शिल्पा 'कॉन्ट्रोव्हर्शियल भाभी' या वेब सीरिजमध्ये दिसली होती, पण टीव्ही मालिकातून ती गायबच होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement