एक्स्प्लोर
कपिल शर्माला प्रेक्षकांना 10 मिनिटंही हसवता आलं नाही, शूटिंग रद्द
मुंबई : सुनील ग्रोवर आणि काही सहकाऱ्यांनी साथ सोडल्यानंतर कपिल शर्माचे दिवस पालटल्याचं चित्र आहे. दहा मिनिटंही प्रेक्षकांना हसवता न आल्याने चित्रीकरण बंद करण्याची वेळ कॉमेडी किंग कपिल शर्मावर आली आहे. गेल्या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे.
विमानात कपिल शर्माच्या गैरवर्तनामुळे सुनील ग्रोव्हरने आधी कपिल शर्माला गूडबाय केलं. त्यानंतर चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुगंधा मिश्रा हे या शोमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे डॉ. गुलाटी, रिंकू भाभी, नानी आणि चंदू चहावाला यांच्या गैवहजेरीत कपिलचा शर्मा शोमधून कॉमेडीच हरवल्याचं स्पष्ट झालं आहे.
प्रेक्षकांना हसवताना कपिलची दमछाक
30 मार्चच्या रात्री कपिल शर्माने किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि टीमच्या नव्या सदस्यांसह चित्रीकरणाला सुरुवात केली. पण नव्या टीमसोबत ताळमेळ बसण्यावत लागणारा वेळ आणि वाईट कॉमिक टायमिंगमुळे, दहा मिनिटं प्रयत्न करुनही प्रेक्षकांना हसवण्यात त्यांना यश आलं नाही. परिणामी त्यांनी चित्रीकरणच रद्द केलं.
यू ट्यूबवरही प्रेक्षकांचं डिसलाईक
कपिल शर्मा शोमध्ये नव्या कलाकारांच्या एन्ट्रीने फारसा फायदा झालेला नाही. मागील आठवड्यात प्रसारित झालेले दोन्ही एपिसोड प्रेक्षकांना आवडले नाही. यू ट्यूबवरही या एपिसोडच्या व्ह्यूवरशिपमध्ये फारच घसरण झाली आहे. एवढंच नाही तर प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या एपिसोडला नापसंती दर्शवली आहे.
दुसरीकडे सुनील ग्रोव्हर सोनी चॅनलच्याच इंडिया आयडॉलमध्ये डॉ. मशहूर गुलाटीच्या रुपातच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. त्याने या एपिसोडच्या चित्रीकरणाला सुरुवातही केली आहे.
संबंधित बातम्या
प्रेक्षकांना हसवताना कपिलची दमछाक, सुनील ग्रोव्हरचा लाईव्ह परफॉर्मन्स हिट
कपिलच्या शोमध्ये ‘नानी’ची ‘घरवापसी’?, सुनील ग्रोव्हरवरुन सस्पेंस कायम
सध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीट
एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत
…म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?
‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?
कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर
कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?
सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट
…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement