![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Video : ‘तो माझ्यासाठी सगळं काही होता...’, सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला अश्रू अनावर! पाहा व्हिडीओ...
Ankita Lokhande : टीव्ही विश्वातला लोकप्रिय शो ‘डीआयडी सुपर मॉम्स’चा आगामी भाग हा ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या मालिकेवर आधारित असणार आहे.
![Video : ‘तो माझ्यासाठी सगळं काही होता...’, सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला अश्रू अनावर! पाहा व्हिडीओ... Ankita Lokhande break out tears in memory of Sushant singh Rajput on DID Super Moms set Video : ‘तो माझ्यासाठी सगळं काही होता...’, सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला अश्रू अनावर! पाहा व्हिडीओ...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/208a50a5ff1f4339bd27cb433d7be5301662107425662373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ankita Lokhande : टीव्ही विश्वातला लोकप्रिय शो ‘डीआयडी सुपर मॉम्स’चा आगामी भाग हा ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या मालिकेवर आधारित असणार आहे. याच खास निमित्ताने मालिकेतील मुख्य कलाकार अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी हजेरी लावली होती. नुकताच या शोचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. या शोचा हा प्रोमो व्हिडीओ सर्वांनाच भावूक करत आहे. या खास भागामध्ये स्पर्धकांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याला श्रद्धांजली वाहिली. यावेळी सुशांतच्या आठवणी पाहून मंचावर उपस्थित असलेल्या अंकिता आणि उषा यांना आपल्या भावनांना बांध घालता आला नाही.
2020मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आकस्मिक मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले होते. आजही चाहते त्याच्या आठवणीत भावूक होतात. अभिनेत्री अंकिता लोखंडेचे सुशांतसोबत खूप जवळचे नाते होते. दोघेही काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे खूपच भावूक होताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ :
एका स्पर्धकाने सुशांतला आदरांजली वाहताना केलेला डान्स परफॉर्मन्स पाहून अंकिता आपल्या भावनांवर रोखू शकली नाही आणि ती सेटवरच रडू लागली. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमध्ये सुशांतच्या आईची भूमिका करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीही यावेळी शोमध्ये उपस्थित होत्या. सुशांत आणि उषा नाडकर्णी यांच्यामध्येही खूप चांगले बॉन्डिंग होते. या प्रसंगी उषा नाडकर्णी यांनाही सुशांतच्या आठवणीत आपले अश्रू आवरता आले नाहीत.
तो माझ्यासाठी खास होता...
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अंकिता लोखंडे म्हणाली की, 'तो खूप जवळचा मित्र होता... माझ्यासाठी तो सर्वकाही होता आणि तो आता जिथे आहे, तिथे खूप आनंदी असेल... देव त्याला नेहमी आनंदी ठेवेल.’ आता या शोचा हा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेदरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली होती. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप सिरियस होते आणि त्यांच्या लग्नाच्याही चर्चाही सुरु झाल्या होत्या. मात्र, काही वर्षांनंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. ब्रेकअपनंतर अंकिता खूपच डिप्रेशनमध्ये असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर सुशांतचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडेनेही गेल्या वर्षी विकी जैनसोबत लग्न केले.
हेही वाचा :
फोटोशूटसाठी अंकिता लोखंडेने परिधान केला डीप नेक ड्रेस, पाहा बोल्ड लूक
Ankita Lokhande: बाबा सिद्दिकीच्या पार्टीसाठी अंकिता आणि विकीचा खास लूक; पाहा फोटो!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)