एक्स्प्लोर
शाहरुख, सलमाननंतर अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'मध्ये
![शाहरुख, सलमाननंतर अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'मध्ये Akshay Kumar To Promote Rustom On Chala Hava Yeu Dya शाहरुख, सलमाननंतर अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'मध्ये](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/11103104/Akshay1-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : 'झी मराठी'वरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'ने फक्त महाराष्ट्र किंवा मराठी कलाकारच नाही तर बॉलिवूड स्टार्सनाही भुरळ घातली आहे. आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर धुमाकूळ घालताना दिसणार आहे.
'चला हवा येऊ द्या'मध्ये आतापर्यंत शाहरुख खान, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. नुकतंच सलमान खाननेही सुलतानच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या'मध्ये उपस्थिती लावली होती.
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर सलमान खानची दबंगगिरी
आता अक्षय कुमार त्याच्या आगामी 'रुस्तम' या सिनेमाचं प्रमोशन 'चला हवा येऊ द्या'मध्ये करणार आहे. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यात अक्षयसोबत एलियाना डिक्रूझ प्रमुख भूमिकेत आहे. अक्षय चांगलं मराठी बोलू शकतो हे सगळ्यांनाच माहित आहे. शिवाय त्याच्या खेळकर वृत्तीमुळे कार्यक्रमात धम्माल करेल यात शंकाच नाही.कपिलही 'सैराट', 'द कपिल शर्मा शो'मध्ये झिंग झिंग झिंगाट
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या शोमध्ये ‘सैराट’ चित्रपटाची टीम हजर राहिली होती. त्यामुळे मराठी चित्रपट आणि बॉलिवूडचा हा आदानप्रदान सोहळा सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)