एक्स्प्लोर

Nisha Rawal : ‘आता ड्रामा बंद कर...’, निशा रावलचा करण मेहरावर पलटवार! रोहित सेठियासोबतच्या नात्यावरही सोडलं मौन

Nisha Rawal : करण मेहराने आपल्यावर लावलेले आरोप मोडून काढण्यासाठी निशा रावल (Nisha Rawal) हिने पत्रकार परिषद घेतली.

Nisha Rawal :  लोकप्रिय टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ‘नैतिक’ची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि त्याची पत्नी निशा रावल (Nisha Rawal) यांच्यात गेल्या 14 महिन्यांपासून वाद सुरु आहेत. दरम्यान, करण मेहराने निशावर विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप केले होते. याप्रकारणावर आपले मौन सोडले आहे. निशाने पत्रकार परिषद घेत पूर्वपती करण मेहरावरच अनेक आरोप लावले आहेत.

करण मेहराने आपल्यावर लावलेले आरोप मोडून काढण्यासाठी निशा रावल (Nisha Rawal) हिने पत्रकार परिषद घेतली. यात ती करणला उद्देशून म्हणाली की, ‘कृपया आता हा ड्रामा बंद कर. या प्रकरणात आता सतत मीडिया ट्रायल होत आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल मला असुरक्षित वाटू लागले आहे. मला स्वतःची आणि माझ्या मुलाच्या भविष्याची भीती वाटतेय. उद्या माझ्या मुलाने हे व्हिडीओ पाहिले किंवा मी त्याच्यासोबत बाहेर गेलो आणि लोक त्याच्यासमोर काही बोलले तर? मला सतत याची चिंता वाटतेय.’

मुलाच्या कस्टडीवरून वाद सुरु

निशा रावल आपल्याला आपल्या मुलाला भेटू देत नसल्याचा आरोप करण मेहराने (Karan Mehra) केला होता. मात्र, आता त्यावर उत्तर देताना निशा म्हणाली, ‘जर त्याने आपल्या मुलाला भेटण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याला कोण रोखणार आहे? आम्ही दोनवेळा समुपदेशन सत्रे केली आणि डॉक्टरांनी त्याला विचारले की, तुम्हाला तुमच्या मुलाला भेटण्याची इच्छा आहे का? पण त्यालाच मुलाला भेटायचे नाही. तो म्हणतो की, त्याला पूर्ण कस्टडी हवी आहे. मात्र, यावेळी तो आपल्याकडे काम नसल्याची कबुली देखील देत आहे. अशा परिस्थितीत, तो मुलाची काळजी कशी घेईल? त्याला फक्त आपल्या अहंकारासाठी मुलाचा वापर करायचा आहे.’

अफेअरवर निशाने सोडलं मौन

करण मेहराने मीडियाशी बोलताना निशा रावलवर अनेक गंभीर आरोप केले होते. मानलेला भाऊ रोहित सेठियासोबत निशाचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू असल्याचे त्याने म्हटले होते. यावर स्पष्टीकरण देताना निशा म्हणाली की, 'याबाबत मी कोणालाच उत्तर देण्यास बांधील नाही. आम्ही दोघे तरुण आहोत. घटस्फोटानंतर मी माझ्या आयुष्यात काय करते, त्याने कोणालाच फरक पडू नये आणि तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो ही त्याची निवड आहे. प्रत्येकाचे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य असते. या प्रकरणात असले आरोप करणे चुकीचे आहे.’

हेही वाचा :

टीव्ही अभिनेता करण मेहरा वादाच्या भोवऱ्यात; पत्नी निशा रावलचा करणवर फसवणुकीचा आरोप

In Pics : घरगुती हिंसा, अटक आणि जामीन ....; ये रिश्ता क्या कहलाता है?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget