एक्स्प्लोर
आदिती गोवित्रीकरच्या बहिणीची पोलिसात धाव, पतीने दारुच्या नशेत मारहाण केल्याचा आरजूचा दावा
गेल्या काही वर्षांपासून पती सिद्धार्थ आपल्याला मद्याच्या अंमलाखाली मारहाण करत असे, असा दावा आरजू गोवित्रीकरने केला आहे. मारहाणीचा पुरावा म्हणून आरजूने सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना सादर केलं आहे.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दारु पिऊन पतीने मारहाण केल्याचा आरोप आरजूने केला आहे. मुंबईतील वरळी पोलिसात सिद्धार्थ सबरवालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून पती सिद्धार्थ आपल्याला मद्याच्या अंमलाखाली मारहाण करत असे, असा दावा आरजूने केला आहे. मारहाणीचा पुरावा म्हणून आरजूने सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना सादर केलं आहे. यामध्ये सिद्धार्थ आरजूशी हुज्जत घालताना आणि मारहाण करताना दिसत आहे.
15 फेब्रुवारीला दारु पिण्यावरुन आरजू आणि सिद्धार्थ यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास सिद्धार्थने आपल्याला बाथरुममध्ये फरफटत नेलं आणि मारहाण केली, असं आरजूने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
आरजू गोवित्रीकर ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आदिती गोवित्रीकरची बहीण आहे. आरजू गोवित्रीकरने काही वर्षांपूर्वी सोनी वाहिनीवरील 'एक लडकी अंजानी सी' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. याशिवाय बागबान, ड्रीम्स, मेरे बाप पहले आप यासारख्या चित्रपटांमध्येही ती झळकली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement