एक्स्प्लोर

राज ठाकरेंची भाषणं मनोरंजनासाठी ऐकावी आणि टाळ्या वाजवाव्या : विक्रम गोखले

यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. या सरकारने नोटाबंदीचा निर्णय घ्यायला घाई केली. मी अर्थशास्त्रज्ञ नाही. मात्र अर्थशास्त्रज्ञांनी नोटाबंदी ही चुकीची असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भाषणं ही केवळ मनोरंजनासाठी ऐकावी आणि टाळ्या वाजवाव्या, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दिली. एबीपी माझाच्या कट्ट्यावर त्यांना राज ठाकरे यांच्या सभांविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरेंची भाषणं  केवळ मनोरंजनासाठी असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरेंचे व्हिडीओ किती खरे आणि किती खोटे आहेत, याबाबत कल्पना नाही. मात्र मनोरंजनासाठी राज ठाकरेंची भाषण बघावी आणि टाळ्या वाजवाव्यात. राज ठाकरे हे छोटे आहेत. त्यांनी दाखविलेले व्हिडीओ किती खरे किती खोटे आहेत हे तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे, असे गोखले म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी बारामतीचा विकास केला. मात्र बारामतीसारखा विकास त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा करायला हवा होता. राष्ट्रवादीत एकमेव व्हिजनरी माणूस म्हणजे शरद पवार हे आहेत. मात्र त्यांनी महाराष्ट्राचा विकास का केला नाही? असा सवाल देखील गोखले यांनी केला. त्यांचे ईव्हीएमबद्दलचे विधान चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. या सरकारने नोटाबंदीचा निर्णय घ्यायला घाई केली. मी अर्थशास्त्रज्ञ नाही. मात्र अर्थशास्त्रज्ञांनी नोटाबंदी ही चुकीची असल्याचं सांगितलं आहे. ही नोटाबंदी नंतरही करता आली असती. नोटाबंदीमुळे काळा पैसा कुठेही थांबणार नाही. नोटाबंदीने काहीच साध्य झालं नाही, असेही ते यावेळी म्हणाले. बुलेट ट्रेन ही प्राथमिकता नाही. या देशातला सामान्य माणूस पाणी, आरोग्य, रस्ते अशा मूलभूत सोयींसाठी झगडत आहे, त्यावेळी अशा गोष्टींची गरज नाही, असेही गोखले यावेळी म्हणाले. कुठेही हत्या होणे हे वाईटच आहे. मात्र अशा हत्या आधी कधीच झाल्या नाहीत का? विचारवंतांना कधीच अटक झाली नाही का? याचा अर्थ असा नाही की आता होतंय ते बरोबर होतं आहे, असेही गोखले यावेळी म्हणाले. नयनतारा सहगल यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला हवं होतं. त्यांना त्यांची भावना मांडू न देणे ही सरकारची चूकच आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
AaiTuljha Bhavani: 'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
Isha Keskar On Marathi Industry: 'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget