Aai Kuthe Kay Karte: ईशाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात, पण देशमुखांच्या घरी वाद; 'हे' आहे कारण
नुकताच आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, देशमुखांच्या घरी वाद सुरु आहेत.
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. लवकरच ईशा बोहल्यावर चढणार आहे. ईशाच्या लग्नाच्या शॉपिंगला सुरुवात झाली आहे. नुकताच आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, देशमुखांच्या घरी वाद सुरु आहेत.
आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, ईशा म्हणते, 'अनिशच्या आईनं माझ्यासाठी खरेदी केली, पैशाच्या आजिबात विचार केला नाही आणि आपण अनिशला साधा सुती कुर्ता घेतला.' यावर ईशाला अरुंधती म्हणते, 'जेवढं करायला पाहिजे तेवढं करतोय आपण.'
पुढे अनिरुद्ध हा अरुंधतीला म्हणतो, 'स्वत: चैनीत राहायचं आणि आपल्या मुलीला मन मारायला सांगायचं.' यावर अरुंधती म्हणते, 'मुलांसाठी सगळेच पैसे कमवतात. पण मुलांवर ते पैसे उधळायचे, असा त्याचा अर्थ होत नाही. आपण मुलांवर संस्कार करतो. त्यांना शिक्षण देतो. आता त्यांचे भविष्य त्यांनी घडवावे.' आता शॉपिंगवरुन देशमुखांच्या घरी वाद सुरु आहेत.
पाहा प्रोमो
View this post on Instagram
अरुंधतीच्या मते, ईशा आणि अनिशचा साखरपूडा हा घरच्या घरीच व्हावा. तर दुसरीकडे ईशाचं म्हणणं आहे की, तिला साखपुडा हा धुमधडाक्यात करायचा आहे. यावरून आणि अरुंधतीमध्ये वाद झाला होता. आई कुठे काय करते या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसले की, संजना आणि अनिरुद्धचं भांडण होतं. आता ईशाचं लग्न धुमधडाक्यात होणार की साध्या पद्धतीनं होणार? हे लवकरच प्रेक्षकांना समजेल.
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: