Daar Ughad Baye : महिला बस कंडक्टर ते सामान्य गृहिणींसोबत पार पडले 'दार उघड बये' मालिकेचे विशेष स्क्रीनिंग
Daar Ughad Baye : महिला बस कंडक्टर, रिक्षा चालक, कमांडो ट्रेनर, संबळ वादक आणि गृहिणींसोबत 'दार उघड बये' या मालिकेचे विशेष स्क्रीनिंग पार पडले आहे.
Daar Ughad Baye : 'दार उघड बये' (Daar Ughad Baye) ही मालिका 19 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे प्रोमो बघून प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच शिगेला पोहोचली असेल. या मालिकेचे औचित्यसाधून झी मराठीने ‘महिला बस कंडक्टर, रिक्षा चालक, कमांडो ट्रेनर, संबळ वादक, गृहिणींसोबत’ मालिकेचे विशेष स्क्रीनिंग ठेवले होते. या सर्वजणी या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी होत्या.
'दार उघड बये' या मालिकेचा भाग बघून झाल्यावर उपस्थित सर्व महिला भारावून गेल्या आणि त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले आणि ही मालिका समाजातील प्रत्येकानी पाहावी असे आवाहन केले. शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव अशी तगडी कलाकारांची फौज ही या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल.
View this post on Instagram
'दार उघड बये' या मालिकेत सानिया चौधरी मुख्य भूमिका साकारत आहे. एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती एक उत्तम नृत्यांगना असून तिने या भूमिकेसाठी संबळ वादनाचे आवर्जून प्रशिक्षण घेतले आहे. या मालिकेबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल बोलताना सानिया म्हणाली,"मी मुक्ता ही भूमिका साकारत असून घर सावरण्यासाठी घरूनच चालत आलेली संबळ वाजण्याची कला मी आत्मसात करते.
सानिया पुढे म्हणाली,"अर्थार्जन करून संबळ वाजवण्याची परंपराही जोपासते. हे एक असं गाव आहे जिथे मुलीच्या हातात संबळ बघणं एक अपशकुन मानलं जातं. फक्त त्या गावात नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याच गावांमध्ये अजूनही मुलींनी संबळ वाजवणं चांगलं मानलं जात नाही. अशा गावात एक साधी, गरीब पण स्वाभिमान जपणारी मुलगी आणि पुरुष प्रधान संस्कृती यांचा लढा या मालिकेत दिसून येणार आहे. तर प्रेक्षकांसाठी ही मालिका बघणं रोमांचक ठरणार आहे.
संबंधित बातम्या