(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागा चैतन्यच्या 'थंडेल'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष
Thandel Teaser : आगामी थंडेल (Thandel) या सिनेमामुळे चर्चेत आहे. थंडेल कधी प्रदर्शित होणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. दरम्यान, आता निर्मात्यांनी थंडेलचा टिझर रिलिज करत प्रेक्षकांना सुखद धक्का दिलाय.
Thandel Teaser : टॉलिवूड अभिनेता नागा चैतन्या (Chaitanya Akkineni) त्याच्या आगामी थंडेल (Thandel) या सिनेमामुळे चर्चेत आहे. थंडेल कधी प्रदर्शित होणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. दरम्यान, आता निर्मात्यांनी थंडेलचा टिझर रिलिज करत प्रेक्षकांना सुखद धक्का दिलाय. थंडेल या सिनेमातील लूकमधील नागा चैतन्य आणि साई पल्लवीचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. दरम्यान, थंडेलच्या टीझरला प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली आहे. टीझरमध्ये नागा चैतन्यला एका मासेमारी करणाऱ्या तरुणाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. या लूकमुळे चाहत्यांचा उत्सुकता वाढली आहे.
पाकिस्तामध्ये पोहोचतो चैतन्य
नागा चैतन्य जलक्षेत्र पार करुन पाकिस्तान (Pakistan) पोहोचतो. त्यानंतर त्याला पाकिस्तानकडून ताब्यात घेणार येते. त्यानंतर त्याला शिक्षाही सुनावण्यात येते. तो लोहोरच्या तुरुंगात शिक्षा भोगताना दाखवण्यात आलाय. मात्र, यातूनही तो आत्मविश्वास गमावून बसत नाही. जेव्हा पाकिस्तानी अधिकारी भारताबाबत चुकीच्या पद्धतीने भाष्य करतात, तेव्हा नागा चैतन्य (Chaitanya Akkineni) पाकिस्तान म्हणजे भारतातून बाहेर पडलेला तुकडा आहे, असे म्हणतो. त्यानंतर तो 'भारत माता की जय' च्या घोषणा देतो.
साई पल्लवीची दमदार अभिनय
या सिनेमात साई पल्लवीची भूमिका अंतिम टप्प्यात सुरु होते. साई चैतन्य पाकिस्तानातून कधी परतणार याचा विचार करत असते. निर्मात्यांनी टिझरच्या माध्यमातून सिनेमातील दृश्य आणि डायलॉग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. टीझर पाहून असे वाटतय की, चंदू मोंडेतीने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा त्याच्या करियरमधील सर्वांत गाजलेला सिनेमा ठरेल. बनी द्वास याच्याद्वारे सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
'थंडेल' च्या टीममध्ये कोण आहे?
नागा चैतन्य (Chaitanya Akkineni) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) या दोघांचा 2021 मध्ये 'लव स्टोरी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता थंडेलच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गीता आर्ट्सच्या बनी वास द्वारे या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता देवी देवी श्री प्रसादने या चित्रपटासाठी संगीत दिले आहे. तर शामदतने सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी संभाळली आहे. दरम्यान, निर्मात्यांनी अद्याप या सिनेमाची रिलीज डेट ठरवलेली नाही. त्यामुळे सिनेमा कधी रिलीज होणार याबाबत संदिग्धता आहे.
Here it is ! #EssenceofThandel https://t.co/gnib1r4jHB
— chaitanya akkineni (@chay_akkineni) January 6, 2024
Thank you at @chandoomondeti for this innovative one and building #ThandelRaju for me .. #AlluAravind #BunnyVas for this opportunity .
Ika Rajulamma jatharae..
ఇక రాజులమ్మ జాతరే 💥💥#Thandel #Dhullakotteyala… pic.twitter.com/vvMr03JK9R
इतर महत्वाच्या बातम्या