एक्स्प्लोर

Tanushree Dutta Crying Video: 'कुणीतरी मदत करा... नाहीतर खूप उशीर होईल', Me Too नंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री रडून-रडून बेहाल; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Tanushree Dutta Crying Video: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामध्ये तिची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचं पाहायला मिळतंय.

Tanushree Dutta Crying Video: बॉलिवूडचं (Bollywood) काळं सत्य आजवर अनेक अभिनेत्रींनी सर्वांसमोर आणलं आहे. अशी एक अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta), जिनं काही दिवसांपूर्वी तिच्यासोबत बॉलिवूडमध्ये (Bollywood News) गैरवर्तन झाल्याचा दावा केलेला. Me Too वर व्यक्त होत, तिनं दिग्गज अभिनेत्याचं नाव घेऊन खळबळजनक आरोप केले होते. पण, सध्या हिच तनुश्री दत्ता फार कठीण काळातून जात आहे. तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती ढसाढसा रडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 2018 च्या Me Too चळवळीदरम्यान आवाज उठवल्यापासून तिला खूप त्रास दिला जात असल्याचं तनुश्रीनं व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. कंटाळून तिनं पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याबाबत सांगितलं आणि मदतीची मागणी केली. 

तनुश्री दत्तानं तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री ढसाढसा रडताना दिसतेय. व्हिडीओमध्ये ती म्हणते की, "मित्रांनो, माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जातोय. माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जातोय. मी नुकताच पोलिसांना फोन केलाय, मी निराशेतून पोलिसांना फोन केला आणि पोलीस आले. त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलंय, जेणेकरून मी योग्यरित्या तक्रार दाखल करू शकेन. कदाचित मी उद्या तिथे जाईन कारण माझी तब्येत ठीक नाही." 

View this post on Instagram
 
A post shared by Tanushree Dutta Miss India Universe (@iamtanushreeduttaofficial)

"स्वतःच्याच घरात, अडचणीत सापडलेय..."

तनुश्री दत्तानं व्हिडीओमध्ये पुढे म्हटलंय की, "मला एवढा त्रास देण्यात आलाय, गेल्या 4-5 वर्षांत की, माझी तब्येत बिघडली आहे. मी काहीच काम करू शकत नाहीये, माझं संपूर्ण कुटुंब बरबाद झालंय, मी हाऊस हेल्परही ठेवू शकत नाही... त्या लोकांनी माझ्या घरात एक हाऊस हेल्पर ठेवलेली, तिच्यामुळे मला अत्यंत वाईट अनुभव आलाय. यायचं आणि चोरी करुन निघून जायचं... मला सर्व कामं स्वतःच करावी लागतायत... मी माझ्याच घरात खूपच अडचणींमध्ये सापडली आहे... प्लीज कुणीतरी माझी मदत करा..." 

"कुणीतरी माझी मदत करा, नाहीतर खूपच उशीर होईल..." 

अभिनेत्रीनं व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "मी या छळाला कंटाळलेय. 2018 च्या 'Me Too' पासून हे सुरू आहे. आज, कंटाळून मी पोलिसांना फोन केला. कृपया कोणीतरी मला मदत करा. खूप उशीर होण्यापूर्वी काहीतरी करा."

नेमकं प्रकरण काय? 

2018 मध्ये Me Tooo चळवळीदरम्यान तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 2008 मध्ये आलेल्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी त्यांचा शारीरिक छळ केल्याचा आरोप अभिनेत्रीनं केला होता. दरम्यान, पोलिसांना अभिनेत्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pragabha Kolekar Reveals Bad Experiences About Industry: 'चल माझ्यासोबत... फक्त तू आणि मी', मराठमोळ्या अभिनेत्रीला दुकानाच्या उद्घाटनाला बोलावलं, नंतर मालकाची नको ती मागणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video: किंग कोहलीला 'फेव्हरेट ग्राउंड'वरही भोपळा फुटला नाही! सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर गंडला
Video: किंग कोहलीला 'फेव्हरेट ग्राउंड'वरही भोपळा फुटला नाही! सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर गंडला
मतांच्या खरेदीसाठी केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी, मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी नाहीत, रोहित पवारांचा प्रहार 
मतांच्या खरेदीसाठी केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी, पण मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी नाहीत, रोहित पवारांचा प्रहार 
Karjat News : पिसाळलेल्या बैलाचा हैदोस! चालत्या मोटारसायकलस्वारला धडक, एकाचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर
पिसाळलेल्या बैलाचा हैदोस! चालत्या मोटारसायकलस्वारला धडक, एकाचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर
Ravindra Dhangekar: मित्रपक्षातील नेत्यांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदे कारवाई करणार? धंगेकरांनी सगळंच सांगितलं, रवींद्र धंगेकर- मुरलीधर मोहोळ वादात ट्विस्ट
मित्रपक्षातील नेत्यांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदे कारवाई करणार? धंगेकरांनी सगळंच सांगितलं, रवींद्र धंगेकर- मुरलीधर मोहोळ वादात ट्विस्ट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Politics: 'ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार', CM फडणवीसांची मोठी घोषणा
Theatre Row: 'स्पर्धा हायजॅक केली', मंत्री Uday Samant यांच्या पत्नी Neelam Shirke Samant यांच्या संस्थेवर गंभीर आरोप
Pune Land Row : 'CM रेसमध्ये कोण?', Ravindra Dhangekar यांचा गौप्यस्फोट उद्या, Murlidhar Mohol टार्गेट?
Thackeray Bhaubeej : ठाकरेंच्या नेक्स्ट जनरेशनची भाऊबीज 'शिवतीर्थ'वर ABP Majha
Thackeray Bhaubeej : ठाकरे बंधू भाऊबीजेला एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video: किंग कोहलीला 'फेव्हरेट ग्राउंड'वरही भोपळा फुटला नाही! सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर गंडला
Video: किंग कोहलीला 'फेव्हरेट ग्राउंड'वरही भोपळा फुटला नाही! सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर गंडला
मतांच्या खरेदीसाठी केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी, मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी नाहीत, रोहित पवारांचा प्रहार 
मतांच्या खरेदीसाठी केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी, पण मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी नाहीत, रोहित पवारांचा प्रहार 
Karjat News : पिसाळलेल्या बैलाचा हैदोस! चालत्या मोटारसायकलस्वारला धडक, एकाचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर
पिसाळलेल्या बैलाचा हैदोस! चालत्या मोटारसायकलस्वारला धडक, एकाचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर
Ravindra Dhangekar: मित्रपक्षातील नेत्यांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदे कारवाई करणार? धंगेकरांनी सगळंच सांगितलं, रवींद्र धंगेकर- मुरलीधर मोहोळ वादात ट्विस्ट
मित्रपक्षातील नेत्यांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदे कारवाई करणार? धंगेकरांनी सगळंच सांगितलं, रवींद्र धंगेकर- मुरलीधर मोहोळ वादात ट्विस्ट
Akshay Kumar In Dipretion: 'अक्षय कुमार डिप्रेशनचा सामना करतोय, कारण...'; बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खळबळजनक दावा, काय म्हणाला?
'अक्षय कुमार डिप्रेशनचा सामना करतोय, कारण...'; बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खळबळजनक दावा
Ind vs Aus 2nd ODI Shubhman Gill VIDEO: ऑस्ट्रेलियात फिरत असताना शुभमन गिलसोबत पाकिस्तानी चाहत्याची नापाक हरकत; जवळ आला अन्...
VIDEO: ऑस्ट्रेलियात फिरत असताना शुभमन गिलसोबत पाकिस्तानी चाहत्याची नापाक हरकत; जवळ आला अन्...
Kalyan Crime : फटाके खरेदीचा वाद विकोपाला; गावगुंडांची पोलिसांसमोर महिलांना मारहाण अन् दगडफेक, कल्याणच्या मोहने परिसरातील घटना
फटाके खरेदीचा वाद विकोपाला; गावगुंडांची पोलिसांसमोर महिलांना मारहाण अन् दगडफेक, कल्याणच्या मोहने परिसरातील घटना
jalgaon News: ऐन दिवाळी सणात वृध्द दांपत्यास उघड्यावर राहण्याची वेळ; घरमालकाने कारण न सांगताच बाहेर काढलं, पावसात, चिखलत काढला दिवस अन्...
ऐन दिवाळी सणात वृध्द दांपत्यास उघड्यावर राहण्याची वेळ; घरमालकाने कारण न सांगताच बाहेर काढलं, पावसात, चिखलत काढला दिवस अन्...
Embed widget