एक्स्प्लोर

Tare Zameen Par Sachet Engineer: 'तारे जमीन पर'मधील ईशानचा 'हुशार भाऊ' आठवतोय? खऱ्या आयुष्यातही तेवढाच जीनियस; परदेशात मिळवली मोठी ओळख, बॉलिवूडमध्ये येणार परत?

चित्रपटानंतर सचेत अचानक मनोरंजनविश्वातून गायब झाला. मात्र जवळपास दोन दशकांनंतरही प्रेक्षक त्याला ईशान अवस्थीच्या मोठ्या भावाच्या भूमिकेसाठी ओळखतात

Taare Zameen Par: 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर' (Tare Zameen Par) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आमिर खान दिग्दर्शित या सिनेमातील ईशान अवस्थी आणि त्याच्या कुटुंबाची कथा आजही अनेकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात ईशानचा हुशार मोठा भाऊ 'योहान अवस्थी' साकारणारा बालकलाकार आठवतोय? या भूमिकेत अभिनेता सचेत इंजिनिअर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मात्र चित्रपटानंतर सचेत अचानक मनोरंजनविश्वातून गायब झाला. मात्र जवळपास दोन दशकांनंतरही प्रेक्षक त्याला ईशान अवस्थीच्या मोठ्या भावाच्या भूमिकेसाठी ओळखतात.

चित्रपटातील योहानप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही हुशार

'तारे जमीन पर'मध्ये सचेतने योहान नंदकिशोर अवस्थी ही भूमिका साकारली होती. अभ्यासात अव्वल, टेबल टेनिसमध्ये पारंगत आणि आपल्या लहान भावाची काळजी घेणारा योहान हा ईशानच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा दाखवण्यात आला होता. ईशानला अक्षरे आणि अंक समजण्यात अडचणी येत असताना योहान शाळेत उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतो. पण तुम्हाला माहिती का, खऱ्या आयुष्यातही ईशानचा ऑन स्क्रीन भाऊ अभिनेता सचेत त्याच्या या भूमिकेशी बऱ्याच अंशी सारखा आहे.


Tare Zameen Par Sachet Engineer: 'तारे जमीन पर'मधील ईशानचा 'हुशार भाऊ' आठवतोय? खऱ्या आयुष्यातही तेवढाच जीनियस; परदेशात मिळवली मोठी ओळख, बॉलिवूडमध्ये येणार परत?

यूकेमध्ये मिळवली मोठी ओळख

अनेक बालकलाकारांप्रमाणे प्रसिद्धीच्या मागे न लागता सचेतने शिक्षणाला प्राधान्य दिलं. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने लंडनमधील UCL Eastman Dental Institute  मधून Periodontology मध्ये M.Clin.Dent पदवी मिळवली आहे. तसेच तो युरोपियन फेडरेशन ऑफ पीरियडोंटोलोजी (EFP) चा नोंदणीकृत सदस्य आहे. याशिवाय त्याने ओव्हरसीज रजिस्ट्रेशन एक्झामिनेशन (ORE) चे दोन्ही टप्पे उत्तीर्ण केले असून त्यामुळे तो यूकेमध्ये डेंटिस्ट होण्यास  पात्र ठरला आहे. परदेशात जाण्यापूर्वी त्याने डी. वाय. पाटील विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं होतं.  Periodontology मध्ये सुवर्णपदकही पटकावलं होतं. त्यामुळे त्याची शैक्षणिक गुणवत्ता केवळ पडद्यावरील भूमिकेपुरती मर्यादित नाही, तर खऱ्या आयुष्यातही तो तेवढाच हुशार आहे.


Tare Zameen Par Sachet Engineer: 'तारे जमीन पर'मधील ईशानचा 'हुशार भाऊ' आठवतोय? खऱ्या आयुष्यातही तेवढाच जीनियस; परदेशात मिळवली मोठी ओळख, बॉलिवूडमध्ये येणार परत?

पायलट होण्यासाठीही घेतोय प्रशिक्षण

दंतवैद्यक क्षेत्राबरोबरच सचेतला विमान उड्डाणाचीही आवड आहे. 2024 मध्ये त्याने विमानाच्या कॉकपिटमधील एक फोटो शेअर करत आपल्या पहिल्या उड्डाणाचा अनुभव सांगितला होता.त्याने लिहिलं होतं, "आकाश नियंत्रणात असताना जमिनीवरील मोठमोठी आव्हानेही क्षुल्लक वाटतात. क्षितिज अमर्याद आहे आणि शक्यताही तितक्याच अमर्याद आहेत. माझे पहिले उड्डाण, पण निश्चितच शेवटचे नाही."


Tare Zameen Par Sachet Engineer: 'तारे जमीन पर'मधील ईशानचा 'हुशार भाऊ' आठवतोय? खऱ्या आयुष्यातही तेवढाच जीनियस; परदेशात मिळवली मोठी ओळख, बॉलिवूडमध्ये येणार परत?

बॉलिवूडमध्ये पुनरागमनाची इच्छा

अभिनय क्षेत्रापासून दूर राहिल्यानंतरही सचेतने बॉलिवूडचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत. एका मुलाखतीत त्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र चार वर्षांनंतरही त्याच्या पुनरागमनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही 'तारे जमीन पर'मधील ईशानच्या गुणी मोठ्या भावाची भूमिका साकारणाऱ्या सचेत इंजिनिअरला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता कायम आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
Toxic Siddharth Malhotra Post: 'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Embed widget