एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुन्हा 'तीच' घटना सुशांतच्या फ्लॅटमध्ये घडणार!
सुशांतच्या आत्महत्येवेळी नेमक्या घटना कशा घडल्या. त्याचा बारीक अभ्यास करून सुशांतच्या बांद्र्याच्या फ्लॅटमध्ये सुशांतच्या मृत्यूचा प्रसंग पुन्हा एकदा वठवला जाणार आहे.
मुंबई : मथळा वाचून धक्का बसला ना? पण हे असंच होणार आहे. त्याच बांद्र्याच्या फ्लॅटमध्ये 14 जूनला सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली होती, तिथे सुशांत पुन्हा एकदा आत्महत्या करणार आहे? पुन्हा एकदा तोच दरवाजा उघडला जाईल. पुन्हा एकदा त्याला खाली बेडवर झोपवलं जाईल. 14 जूनला जे झालं.. ते तसंच होणार आहे. होय, कारण आता तपास सीबीआयकडे गेला आहे. सीबीआय पुन्हा तेच नाट्य जिवंत करणार आहे. त्याच सुशांतच्या फ्लॅटमध्ये.
सुशांतसिंह राजपूत प्रकरण आता सीबीआयच्या हाती गेलं आहे. महाराष्ट्र सरकारनेही आपण कोर्टाच्या निर्णयाचा आदर करत असून, आपण सीबीआयला पूर्ण सहकार्य करू असं सांगितलं आहे. त्यामुळे दिल्लीतली सीबीआय टीम मुंबईत आली की ती नियमानुसार क्वारंटाईन होणार नाहीय. आल्या आल्या सीबीआयवाले काम सुरू करणार आहेत. सुशांतच्या आत्महत्येवेळी नेमक्या घटना कशा घडल्या. त्याचा बारीक अभ्यास करून सुशांतच्या बांद्र्याच्या फ्लॅटमध्ये सुशांतच्या मृत्यूचा प्रसंग पुन्हा एकदा वठवला जाणार आहे. सुशांतच्या उंचीचा, त्याच्या वजनाचा आणखी एक 'सुशांत' पुन्हा एकदा आत्महत्या करणार आहे. ते नाट्य असेल.
सुशांत प्रकरणी सीबीआय पुन्हा एकदा सगळा घटनाक्रम तपासून पाहील. सुशांतची उंची.. त्याच्या सीलिंगची असलेली उंची.. त्याचं वजन.. तिथला फॅन.. असं सगळं.. रिक्रिएट होईल. ही आत्महत्या खोटीच असेल. पण जास्तीत जास्त खऱ्या टर्मवर ते नाट्य घडणार आहे. सुशांतची आत्महत्या होती की हत्या याचा तपास करण्यासाठी हे नाट्य आवश्यक असल्याचं कळतं.
महाराष्ट्र सरकार रिव्हिव्ह याचिका दाखल करणार नाही
सुशांत प्रकरणी महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात पुन्हा रिव्हिव्ह याचिका दाखल करणार नाही. मुंबई पोलीस सीबीआयला सहकार्य करणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल- शरद पवार
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करुन महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल अशी खात्री असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसंच मला आशा आहे की, या तपासाची परिणीती डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासाप्रमाणे होणार नाही, असंही पवार म्हणाले. शरद पवार यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरु झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणीती होणार नाही."
सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देश
सुप्रीम कोर्टाने काल (19 ऑगस्ट) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.
संबंधित बातम्या
- CBI Investigation in SSR Death Case: आपलेच दात आणि आपलेच ओठ; संजय राऊतांचा राज्यातल्या भाजप नेत्यांवर निशाणा
- CBI Investigation in SSR Death Case: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतच्या कुटुबियांची पहिली प्रतिक्रिया...
- SSR Case SC Verdict | सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे म्हणते...
- CBI Investigation in SSR Death Case | अन्यायाविरुद्धचा विजय, बिहार डीजीपींची प्रतिक्रिया, कुटुंबियांकडूनही निर्णयाचं स्वागत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
Advertisement