मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सध्या सीबीआय कसून तपास करत आहे. तसेच या प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आल्यानंतर एनसीबीकडूनही कारवाई करण्यात आली आहे. एवढचं नाहीतर सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला राजकीय आणि षड्यंत्र असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांचंही सत्र सुरु आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. ज्यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी स्वतः स्पष्टीकरण देत आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचं सांगितलं होतं.


सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू प्रकरणाच्या या संपूर्ण घडामोडींवर आधारीत 'सुसाइड ऑर मर्डर' या चित्रपटांची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटात आदित्य ठाकरे यांच्याशी मिळतं-जुळतं पात्रही दिसून येणार असून ही भूमिका अभिनेता प्रभव उपाध्याय साकारणार असल्याचं बोलंल जात आहे.


चित्रपटातील पात्रांना खरी नावं नाहीत


चित्रपटात आदित्य ठाकरे यांच्याशी मिळतं जुळत्या पात्राच्या संदर्भात चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, 'चित्रपटाचं कथानक आणि पात्रांनुसार आम्ही कलाकारांची निवड करत आहोत.' विजय शेखर गुप्ता यांनी पुढे बोलताना सांगितले की, 'कोणत्याही पात्राला खरी नावं देण्यात येणार नाहीत आणि या राजकीय पात्राचं नावंही बदलण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की, 'आम्ही हे कधीच म्हणणार नाही की, हे पात्र आदित्य ठाकरे यांच्यावर आधारीत आहे.'


विजय शेखर गुप्ता यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 'सुसाइड आणि मर्डर' या चित्रपटाचा शुभारंभ 25 डिसेंबर रोजी नोएडातील हॉटेल ब्लू रेडिसानमध्ये करण्याचा प्लान केला आहे. तसेच चित्रपटाची शुटींग 30 सप्टेंबर रोजी सुरु करणार असल्याचंही सांगितलं. या चित्रपटाचं पहिलं शेड्यूल 40 दिवसांचं असेल आणि चित्रीकरण ग्रेटर नोएडा, दिल्ली आणि मुंबईमध्ये करण्यात येणार आहे.


दरम्यान, 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या 4 दिवसांनी त्याच्या आयुष्यावर आधारीत 'सुसाइड ऑर मर्डर' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. एवढचं नाहीतर घोषणा केल्यानंतर काहीच दिवसांत चित्रपटांच्या प्रमुख व्यक्तीरेखा निश्चित करण्यात आल्या होत्या. सुशांत सिंह राजपूत (सचिन तिवारी), रिया चक्रवर्ती (श्वेता पराशर), करण जोहर (राणा) यांची भूमिका साकारणार आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :