मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीने मोठं वक्तव्य केलं आहे. "आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही तसंच त्यांना कधीही भेटले नाही," असं रियाने म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केल्यामुळे राजकारण तापलं आहे. अशातच रिया चक्रवर्तीचं वक्तव्य महत्त्वाचं समजलं जात आहे.


सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करायचा की सीबीआयने यासंदर्भातील दाखल याचिकेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान विरोधी पक्षाच्या वकिलांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं होतं. तसंच विरोधकांकडूनही सातत्याने आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले जात होता. यावरुन स्वत: आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिकाही मांडली होती. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरेंचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं होतं.


त्यावर आता रियानेच आदित्य ठाकरे यांना ओळखत नसल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, "मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही. त्यांना कधीही भेटले नाही. तसचं कधी फोन वर सुद्धा बोलणं झालं नाही. शिवसेनेचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल ऐकलं आहे."


कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य होणार नाही : आदित्य ठाकरे
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकरणात जाहीर भूमिका मांडली. "मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी संयमाने वागतोच आहे. अशा प्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कुणीही राहू नये," असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.


माझ्याविरोधात काहीही संशयास्पद मिळालेलं नाही : रिया
रिया म्हणाली की, "मी सुशांतकडून कधीही पैसे घेतले नाही. मुंबई पोलीस आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांनी सगळ्या दस्तऐवजांची तपासणी केली आहे. त्यांना माझ्याविरुद्ध काहीही संशयास्पद सापडलेलं नाही." तसंच मी तिसऱ्या तपास यंत्रणेच्या चौकशीसाठी तयार असल्याचंही रियाने म्हटलं.


मुंबई पोलीस आणि ईडीने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक, फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवाल घेतला आहे. बँक स्टेटमेंट, इन्कम टॅक्स, सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर और इलेक्ट्रोॉनिक डेटा हे सगळं दोन्ही यंत्रणांकडे आहे, पण माझ्याविरोधात काहीही संशयास्पद सापडलेलं नाही, असं रिया म्हणाली.


रियाने म्हटलं आहे की, मीडियाने कोणत्याही अटकळ बांधू नये. माझं मौन माझा कमकुवतपणा नाही. सत्य कधीही बदलत नाही. मृत्यूच्या 40 दिवसांनंतर बिहार पोलिसांचं समोर येणं हास्यास्पद आहे. सुशांतच्या कुटुंबीयांचे आरोप बिनबुडाचे आहेत. सुशांत वारंवार कुटुंबाला फोन करत होता.


संबंधित बातम्या


शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य होणार नाही : आदित्य ठाकरे


आदित्य ठाकरेंविरोधात कारस्थान करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल : संजय राऊत



साहब को बुरा लगेगा इसलिये?'; कंगनाच्या रडारवर आता आदित्य ठाकरे


SSR Suicide Case | मी आदित्य ठाकरे यांना कधीच भेटले नाही : रिया चक्रवर्ती