मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करत आहे. काल सकाळीच एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी धाड टाकत घराची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. काल रात्री जवळपास 10 वाजता शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीकडून अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी एनसीबीची दोन पथकं शौविकच्या घरी तपासासाठी गेली होती तर सॅम्युअलच्या घरी NDPS अॅक्ट अंतर्गत झडती घेण्यात आली. जवळपास 3 ते 4 तास झडती घेतल्यानंतर दोघांनाही NCB मुंबईतील ऑफिसमध्ये चौकशीसाठी आणण्यात आलं होतं.


शौविक चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन


बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकचं 10 ऑक्टोबर 2019 मधील एक चॅट समोर आलं आहे. यामध्ये शौविक आपल्या एका मित्राशी ड्रग्ज संदर्भातील काही गोष्टी बोलत होता. शौविकचा मित्र त्याच्याकडे विड, हॅश आणि बड यांसारख्या ड्रग्ज संदर्भात विचारत होता. त्यावेळी त्याला उत्तर देताना शौविकने बडसाठी जैद आणि बासित यांचे नंबर दिले होते. यादोघांमधील पुढिल संवादात करमजीत आणि राज यांचीही नावं समोर येतात. NCB च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शौविक जैदच्या संपर्कात होता. तसेच ड्रग्स खरेदी करण्यासंदर्भात रिया आणि शौविक यांच्यातील संभाषण काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.


पाहा व्हिडीओ : सुशांत ड्रग्जप्रकरणी शोविक आणि मिरांडाला अटक, रिया ड्रग्ज मागवत असल्याची कबुली



कसं आहे ड्रग्ज कनेक्शन?


28 ऑगस्ट रोजी एनसीबीने अब्बास अली लखानी नावाच्या ड्रग्ज पेडलरला वांद्रे परिसरात 46 ग्रॅम गांजासोबत पकडलं होतं. त्यानंतर अब्बासने दिलेल्या माहितीनुसार, अब्बासला गांजा पुरवणाऱ्या कर्ण अरोरो याला चांदिवली परिसरातून आटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 13 ग्राम गांजा हस्तगत करण्यात आला होता. या दोघांना अटक केल्यानंतर एनसीबीच्या निशाण्यावर जैद वीलांत्रा आणि अब्दुल बासित परिहार हे होते. जैदकडे कोणत्याही ड्रग्ज सापडल्या नाहीत. परंतु, त्याच्याकडे 9.55 लाख रुपये, 2081 अमेरिकी डॉलर, 180 यूके पाउंड आणि 15 दिरहम सापडले होते.


NCB ने दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम ड्रग्ज विकून कमावण्यात आली होती. अब्दुल बासितचं कनेक्शन सॅम्युअल मिरांडासोबत असल्याचं समोर आलं. रियाचा भाऊ शौविकने दिलेल्या माहितीनुसार, सॅम्युअल अब्दुल बासितकडून ड्रग्ज घेत होता. समोर आलेल्या व्हॉट्सॅप चॅटनुसार, याच ड्रग्ज नेटवर्कशी जोडलेल्या कैजन इब्राहिमलाही अटक करण्यात आली.


आतापर्यंत 7 लोकांना अटक


सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी आतापर्यंत 7 लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अब्बास रमजान अली लखानी, कर्ण अरोरा, जैद वीलांत्रा, अब्दुल बासित परिहार, कैजान इब्राहिम, सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती यांना NCB ने अटक केली आहे. कैजन, सॅम्युअल आणि शौविक या तिघांना शनिवारी कोर्टात हजर करण्यात येईल.


महत्त्वाच्या बातम्या :