मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अनेक उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. एकिकडे ती आत्महत्या असल्याचं निष्पन्न होत असतानाच, ती आत्महत्या असली तरी तो मर्डर असं मानणारा मोठा वर्ग तयार होऊ लागला आहे. अभिनेत्री कंगना रनौतने सातत्याने यावर आवाज उठवला आहे. आता तर ट्विटद्वारे तिने पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच टारगेट केलं आहे.



कंगना रनौतची डिजिटल टीम तिचं ट्विटर अकाऊंट चालवते. तिच्या अकाऊंटचं नावही टीम कंगना रनौत असं आहे. त्यावर या टीमने हे ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. पहिल्या ट्विटमध्ये ती म्हणते, 'करण जोहर यांच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आलं आहे. पण करण जोहर यांना मात्र अद्याप समन्स बजावण्यात आलेलं नाही. का? तर ते मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र आहेत म्हणून? मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह राजपूतच्या हत्येची चेष्टा थांबवावी'


यालाच जोडून तिने दुसरं ट्विटही केलं आहे. त्यात तिची टीम म्हणते, 'कंगना रनौतच्या मॅनेजरला समन्स बजावण्यात आलेलं नाही. तिथे मात्र थेट तिला समन्स बजावण्यात आलं. मग करण जोहरच्या मात्र मॅनेजरला समन्स बजावण्यात आलं. मुंबई पोलिसांनी तपासात चालवलेल्या निर्लज्ज नेपोटिझम थांबवावा. करण जोहरला समन्स पाठवण्यात आलं नाही, कारण, साहेब को बुरा लगेगा' असं सांगून तिने एकप्रकारे आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.


पाहा व्हिडीओ : आदित्य ठाकरे यांचा मित्र असल्याने करण जोहर अजून चौकशीविना : कंगना रनौत



तिच्या या ट्विटवर अद्याप आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस यापैकी कुणीही काहीही रिल्पाय दिलेला नाही. मात्र करण जोहरच्या मॅनेजरला हे समन्स कसं काय पाठवलं याबाबत यानिमित्ताने चर्चा सुरु झाली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी आल्यानंतर कंगना सातत्याने बोलते आहे. ही घटना घडल्यानंतर लगेचंच कंगना रनौतने आपल्या इन्स्टाग्रामवर दोन व्हिडीओ शेअर केले होते. यात तिने सुशांतने आत्महत्या केली नसून ती हत्या असल्याचा उच्चार केला आहे. त्यानंतर सातत्याने तिने सुशांतच्या तपासाची बाजू लावून धरली आहे. ती हत्याच असून वारंवार त्याकडे तिने आपल्या सोशल अकाऊंटद्वारे लक्ष वेधलं आहे.



अर्थात कंगनाने नुकतंच पुन्हा एकदा ट्वीट करून इंडस्ट्रीची मानसिकता समोर आणली आहे. 'तुमचं डोकं आमच्या पुढे चालत असेल.. तुम्ही आमच्या पेक्षा हुशार असाल.. तर तुम्ही इथून नाहिसे झालेले कधीही चांगलं, असा इंडस्ट्रीचा एटिट्यूड असून हा एटिट्यूड बदलला पाहिजे' असं तिने आपल्या नव्या ट्विटमध्ये सांगितंल आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


कंगनाच्या टोमण्यांनी तापसी भडकली.. कंगना तडकली


"जावेद अख्तर मला म्हणाले होते तू आत्महत्या करशील," कंगना रनौतचा गंभीर आरोप



अभिनेत्री सिमी गरेवाल म्हणतात, माझंही करिअर खराब करण्याचा प्रयत्न, पण कंगनासारखी हिंमत नव्हती!