बिग बॉस मराठी सिझन 6मध्ये झापुक झुपूक एन्ट्री? सुरज चव्हाण पत्नीसोबत दिसणार? मुलाखतीतून स्वत: केला खुलासा
Suraj Chavan Reacts to Bigg Boss Marathi Season 6 Entry Rumours:सुरज चव्हाणला सिझन 6 साठी आमंत्रण आल्याची कबुली. गेस्ट म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री होण्याची शक्यता.

Suraj Chavan Reacts to Bigg Boss Marathi Season 6 Entry Rumours: बिग बॉस मराठी सिझन 6 या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात विविध व्यासपीठावरील कलाकारांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कलाकारांना प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. विविध टास्कमुळे हा शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. बिग बॉस या शोमुळे कलाकारांना अधिक प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस 5 या सिझनचा विजेता सुरज चव्हाण ठरला. सुरज चव्हाणने आपल्या झापूक झुपूक स्टाईलने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. बिग बॉसमुळे त्याला एक नवीन ओळख मिळाली. दरम्यान, बिग बॉसच्या सहाव्या सिझनमध्ये त्याला आमंत्रण देण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये जाणार की नाही? हे लवकरच स्पष्ट होईल.
बिग बॉस मराठी सिझन 5ची ट्रॉफी सुरजने आपल्या नावे केली. या शोमुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. काही महिन्यांपूर्वी सुरज विवाहबंधनात अडकला. त्यानं आपल्या मामाच्या मुलीशी लग्नगाठ बांधली. एका ट्रॉफीमुळे त्याच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. सुरज चव्हाण हटक्या स्टाइलमुळे फेमस झाला. डायलॉगमुळे आणि व्हायरल रिल्समुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस सिझन 5 मधील प्रत्येक कलाकार आपल्या हटक्या शैलीमुळे फेमस झाले.
बिग बॉसच्या घरात पुन्हा सुरज चव्हाणची एन्ट्री?
View this post on Instagram
दरम्यान, बिग बॉस मराठी सिझन 6 सुरू झाला आहे. बिग बॉस मराठी सिझन 6 ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एकाच आठवड्यात अनेक राडे झाले. 17 स्पर्धकांची जुगलबंदी या कार्यक्रमातून पाहायला मिळत आहे. दरम्यान, सुरज चव्हाण बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये दिसणार का? बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार का? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांकडून उपस्थित केले जात आहे. दरम्यान, सुरजला वाहिनीकडून बोलावणं आलं असल्याची माहिती आहे.
बिग बॉस मराठी सिझन 6 च्या घरात जाण्यासाठी आमंत्रण आल्याची माहिती सुरज चव्हाणने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. सुरज चव्हाणला, "बिग बॉस मराठी सिझन 6 मधून ऑफर आली आहे का? तुम्ही दोघेही एकत्र जोडीने जाणार का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सुरज, "त्याविषयी काय जायचं ना.. त्यांनी बोलवलं म्हटल्यावर जायला लागतंय, असं गेस्ट म्हणून जायचं", असं म्हटला. त्यामुळे सुरज चव्हाण लवकरच आपल्या पत्नीसोबत बिग बॉसच्या घरात गेस्ट म्हणून दिसणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.
























