Suraj Chavan : 'भेटला विठ्ठल...', आधी वाकून नमस्कार केला अन् नंतर कडकडून मिठी मारली; केदार शिंदे आणि सूरजची 'स्पेशल' भेट
Suraj Chavan : सूरज चव्हाणने केदार शिंदेंची भेट घेतली असून त्यांच्या भेटीचा एक व्हिडीओ शेअर केलाय.
Suraj Chavan and Kedar Shinde Meeting : बिग बॉसचं (Bigg Boss Marathi New Season) विजेतपद मिळवण्याआधी सूरजला (Suraj Chavan) केदार शिदेंकडून एक खास भेट मिळाली होती. केदार शिंदे (Kedar Shinde) हे सूरजवर सिनेमा काढणार असून झापूकझूपूक असं या सिनेमाचं नाव आहे. सूरजने नुकतीच त्याच्या वाढदिवसानिमित्ताने केदार शिंदेंची भेट घेतली. यावेळी केदार शिंदेंनी त्याला एक खास भेटवस्तूही दिली
सूरजने केदार शिंदे यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओला त्याने भेटला विठ्ठल माझा हे गाणं लावलं आहे. सूरज केदार शिंदेंना घट्ट मिठी मारताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये केदार शिंदे सूरजला काही भेटवस्तू देतानाही पाहायला मिळतंय. केदार शिंदे यांनी सूरजला देवाच्या पादुका दिल्या आहेत.
केदार शिंदे माझ्यासाठी देव - सूरज चव्हाण
सूरजने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एबीपी माझालाही मुलाखत दिली. त्यावेळी केदार शिंदे यांच्याविषयी बोलताना केदारने म्हटलं की, 'केदार सर माझे देवच आहेत. मला त्यांनी मुलगाच मानलंय. मला खूप आनंद आहे की, ते माझ्या झापूकझूपूक पॅर्टनमध्ये आता सिनेमा काढतायत.'
सूरजने सांगितल्या लहानपणीच्या आठवणी
दरम्यान सूरजने यावेळी कट्टावर त्याच्या लहानपणीच्याही आठवणी सांगितल्या आहेत. 'मी लहानपणी खूप मस्ती करायचो. म्हणजे मी शाळेत मुलांची डोकी फोडायचो.. राग आला की असं व्हायचं माझ्याकडून.. दगडाने मी पोरांची डोकी फोडायचो.. क्रिकेटविषयीच्या आठवणी सांगताना सूरजने म्हटलं की, मी आधापासून क्रिकेट खेळतो. मला बॅटिंग,बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्हीही येतं. मी वादळ येतं तशी बॉलिंग करतो. वेगाने असा स्टंप उडवतो आणि विकेच काढतो.'
'आता माझा गुलीगत बंगला होणार'
सूरजने बिग बॉसची ट्रॉफी उचलल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. इतकच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या या लेकाची पुण्यात विशेष भेटही घेतली. याचवेळी अजित पवारांनी सूरजच्या घराविषयी सूचना देत त्याला नवं घर बांधून देणार असल्याचं जाहीर केलं. यावर सूरजने माझा कट्टावर बोलताना म्हटलं की, 'आमचं घर नव्हतं. आता माझं नवीन घर होणार आहे. माझा गुलीगत बंगला होणार आहे.'
View this post on Instagram