Sunjay Kapur Last Rites: मृत्यूच्या 8 दिवसानंतरही संजय कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत? कुटुंबीयांनी दिली महत्त्वाची अपडेट
Sunjay Kapur Last Rites: सोना कॉमस्टारचे अध्यक्ष संजय कपूर यांचं 12 जून रोजी निधन झालं. आता त्यांच्या मृत्यूनंतर 8 दिवसांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Sunjay Kapur Last Rites: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karisma Kapoor) घटस्फोटीत पती प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर (Sanjay Kapoor) यांचं 12 जून रोजी निधन झालंय. लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि त्यांनी ती चुकून गिळली. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यांचं निधन झालं. मृत्यूला आठ दिवस उलटले तरीसुद्धा अद्याप संजय कपूर (Sunjay Kapur Death) यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत, अशातच आता त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत कुटुंबीयांनी मोठी अपडेट शेअर केली आहे. संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर तब्बल 8 दिवसांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
एनडीटीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, संजय कपूर यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आणि त्यामध्ये संजय कपूर यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित तपशील शेअर केले. संजय कपूर यांचे अंत्यसंस्कार 19 जून 2005 रोजी दिल्लीत होतील. संजय कपूर यांना दिल्लीत अंतिम निरोप दिला जाईल.
लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील
संजय कपूर यांचं निधन यूकेमध्ये झालं आणि त्यांच्याकडे अमेरिकेचं नागरिकत्व आहे. त्यामुळे काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागली आणि यामुळेच त्यांचा मृतदेह भारतात आणण्यास विलंब झाला. आता 19 जून, गुरुवारी, संजय कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता नवी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत संजय कपूर यांच्यावर अत्यंसंस्कार केले जातील. घटस्फोटीत पतीच्या अंत्यसंस्कारासाठी करिश्मा कपूर तिच्या दोन्ही मुलांसोबत उपस्थित राहू शकते. याशिवाय 22 जून, 2025 रोजी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान संजय कपूर यांच्या प्रेयर मीटचं आयोजन करण्यात आलं आहे.
मृत्यूच्या काही क्षणांपूर्वी काय म्हणालेले संजय कपूर?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कपूर यांनी लंडनमध्ये पोलो खेळत असताना मधमाशी गिळली. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. संजय कपूर यांचं वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी निधन झालं. मृत्यूच्या काही क्षणापूर्वी संजय कपूर यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यावेळी मी काहीतरी गिळलंय, असं ते म्हणाले.
संजय कपूर यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात कोण?
संजय कपूर यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी प्रिया सचदेव, आई राणी सुरिंदर कपूर आणि चार मुलं आहेत. त्यांना त्यांची दुसरी पत्नी करिश्मा कपूरपासून एक मुलगी समायरा आणि मुलगा कियान आहे. त्यांच्या तिसऱ्या पत्नीच्या पहिल्या लग्नापासून त्यांना एक मुलगी सफिरा आहे. याशिवाय संजय आणि प्रियाला एक 6 वर्षांचा मुलगा देखील आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























