एक्स्प्लोर

Sunil Barve on CJP: 'CJP आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ..' सुनील बर्वेंच्या पोस्टवर ट्रोलिंग; VIDEO वर चाहत्यांचे सवाल

'ही भूमिका आधी का घेतली नाही?' असा सवाल अनेकांनी त्यांना या पोस्टखाली विचारलाय. काहींनी त्यांच्या भूमिकेचे स्वागतही केले आहे. 

Sunil Barve on  CJP Protest:  नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने (CJP) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. CJPच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळताना दिसतोय. अनेक मराठी- हिंदी कलाकार, दिग्गजांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचं म्हणत विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहिलेत. तर अनेकांनी सरकारच्या भूमिकेची पाठराखण केल्याचं दिसलं. अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे. त्यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.  कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामागे राजकीय स्वार्थ लपले नाहीत ना, हाकणात यात आपण बळी पडत नाही ना? असा सवाल करत अभिनेत्री सुनील बर्वे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी ट्रोलिंग सुरू केलंय.  'ही भूमिका आधी का घेतली नाही?' असा सवाल अनेकांनी त्यांना या पोस्टखाली विचारलाय. काहींनी त्यांच्या भूमिकेचे स्वागतही केले आहे. 

काय म्हणाले सुनील बर्वे?

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सुनील बर्वे म्हणाले 'नमस्कार, मी सुनील बर्वे. एका अत्यंत गंभीर किंवा संवेदनशील विषयावर माझं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून, खरंतर महिन्याभरापासून म्हटलं तरी चालेल; आपल्याकडे आंदोलन सुरू आहेत. सरकारच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की नीट परीक्षेचं प्रकरण असू देत, पेपर फुटीचे प्रकरण असू देत किंवा सोनम वांगचुकजी यांचा उपोषण असू देत, पण याचा कदाचित गैरफायदा कुठल्यातरी राजकीय अधिष्ठानासाठी घेतला जातोय. आपण जेव्हा आंदोलन करतो, तेंव्हा आपल्यावर कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही ना, कोणाचे छुपे अजेंडा साधून घेण्याचा प्रयत्न नाही ना, हे पाहणंही आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं, मी सर्वप्रथम सोनम वांगचुक यांना विनंती करतो की त्यांनी उपोषण मागे घ्यावं. त्यांनी सरकारची चर्चा करावी.यातून काहीतरी सकारात्मक मार्ग काढावा. याच पद्धतीने नीट परीक्षेचा आंदोलन सुरु आहे. जे झालंय ते अतिशय खेदजनक आहे.क्लेशकारक आहे.

'यामध्ये जी मंडळी भरडली गेली असतील, ज्यांचं नुकसान  झालंय. त्यांच्या घरच्यांप्रती मी माझ्या सहवेदना व्यक्त करतो. अत्यंत दुःखदायक अशा गोष्टी आहेत या. कुठल्याही विद्यार्थ्यांचा, तरुणाचा जीव जाऊ नये, हे अंतिम उद्दिष्ट असावे. माझी सरकारला ही विनंती आहे की, आता तुम्ही चर्चेसाठी तुमचे दरवाजे खुले केले आहेत तर साधक बाधक चर्चा व्हावी.विद्यार्थ्यांसाठी जो आवश्यक निर्णय असेल तो त्यांनी घ्यावा. दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी. माझे सगळ्यांना विनंती आहे, आपले विचार कदाचित वेगळे असतील, पण या विचारान पलीकडे जाऊन कोणाचा तरी जीव हा महत्त्वाचा असतो. तो सामान्य व्यक्तीचा असू दे किंवा प्रतिष्ठित व्यक्तीचा असू दे. कोणाचाही जीवाला धोका होऊ नये हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.' असं सुनील बर्वे म्हणाले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunil Barve (@sunilbarve)

अभिनेते सुनील बर्वे यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  एका चाहत्याने म्हटले ' हेच आधी का म्हटले नाही ?' तर काहींनी विरोधी बोलताना एवढे का घाबरता? असा सवालही केलाय.. एक चाहतीने म्हटले " सध्याच्या परिस्थितीबाबत इतका संतुलित आणि राजकारणापासून अलिप्त दृष्टिकोन मांडल्याबद्दल धन्यवाद. पण तुमच्यासारखा विचार प्रत्येकजण करत नाही. अनेक अभिनेते या आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत आणि विद्यार्थ्यांबद्दल त्यांना किती काळजी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खरोखरच त्यांना विद्यार्थ्यांची चिंता आहे का, की हा केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा आणि फोटो काढून घेण्याचा एक प्रकार आहे?"

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget