एक्स्प्लोर

Sun Marathi Serial:'सन मराठी'वर येतेय रहस्यांनी भरलेली नवी मालिका; ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत; प्रोमोची एकच चर्चा

एकंदरीतच आयुष्यात येणारी अनपेक्षित वळणं, नात्यांमधील गुंतागुंत आणि भावनांनी भरलेला प्रवास या मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Sun Marathi Serial: 'सन मराठी' वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अव्वल ठरली आहे. वाहिनीवर नेहमीच मनोरंजक व महिला सक्षमीकरण विषयावर आधारित मालिका प्रसारित केल्या जातात. अशातच एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या नव्या मालिकेचं नाव 'सौभाग्यवती वृंदा मोहन' असं असून मालिकेचा विषय रहस्यमय आणि गूढतेने भरलेला असल्याचं दिसून येत आहे. मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमध्ये एक तरुणी तिच्या नवऱ्याचा शोध घेताना पाहायला मिळते. नवऱ्याचा शोध घेत असताना बऱ्याच अडचणींचा सामना तिला करावा लागतो. या शोधामागे नेमकं कोणतं गूढ दडलं आहे आणि वृंदाच्या आयुष्यात कोणती रहस्यं उलगडणार आहेत, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. नवऱ्याचा शोध घेत असताना वृंदा स्वतःच एखाद्या नव्या सापळ्यात अडकेल का? हे पाहणं रंजक ठरेल. एकंदरीतच आयुष्यात येणारी अनपेक्षित वळणं, नात्यांमधील गुंतागुंत आणि भावनांनी भरलेला प्रवास या मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. येत्या ६ जुलै पासून सौभाग्य रक्षणाचा थरारक प्रवास सुरू होणार आहे.

 

 
 
 
 
 
Instagram पर यह पोस्ट देखें
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sun Marathi (@sunmarathi) द्वारा साझा की गई पोस्ट

नवऱ्याचा शोध घेणार की स्वतःचा जीव वाचवणार?

या मालिकेत वृंदा या मुख्य भूमिकेत अभिनेत्री स्वाती भिंगारदिवे दिसून येत आहे. या भूमिकेविषयी बोलताना स्वाती म्हणाली की, " 'सौभाग्यवती वृंदा मोहन' हे नाव आणि मालिकेची गोष्ट इतकी भन्नाट आहे की मी लगेचच मालिकेसाठी होकार दिला. वृंदा हे पात्र खूप भन्नाट आहे. स्वतःच्या नवऱ्याचा शोध घेण्यासाठी ती मुंबईत पोहोचते पण तिकडे नक्की तिच्यासोबत काय घडणार? हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. प्रोमो पाहून बऱ्याच जणांनी खूप कौतुक केलं पण सगळ्यांना उत्सुकता आहे मालिकेत नक्की काय घडणार? वृंदा म्हणजे जणू सावित्री आहे. मोहनसाठी ती काही ही करू शकते. अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालायला देखील ती तयार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेत ड्रामा, सस्पेन्स , थ्रिल हे सगळच पहायला मिळणार आहे. मी पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारत आहे त्यामुळे एक जबाबदारी,थोडं दडपण आहे."

 यापुढे स्वाती म्हणाली, "मी अनेकदा मुख्य भूमिकांसाठी ऑडिशन दिल्या होत्या, पण काही ना काही कारणाने त्या भूमिका माझ्या वाट्याला येत नव्हत्या. कदाचित त्या भूमिकांसाठी मी बनले नव्हते. पण या मालिकेतील वृंदाचे पात्र वाचल्यानंतर ही भूमिका मलाच मिळावी, अशी मनापासून इच्छा होती.  खरंतर वृंदाच पात्र वाचून मी फक्त मॅनिफेस्ट करत होते. आणि  माझी निवड झाल्याचा फोन आला, तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि ती वेळ आली की आपल्यासाठी जे योग्य असते ते नक्की मिळते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. यापूर्वी मी 'सन मराठी'सोबत काम केले आहे, मात्र मुख्य भूमिकेतून प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचा मला खूप आनंद आहे."

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Embed widget