एक्स्प्लोर

Pranit More Controversy: मी चुकलो, थांबवू शकलो असतो...प्रणित मोरेने हात जोडले; शोमध्ये नेमकं काय घडलं?, माफी मागत सगळं सांगितलं!

Pranit More Breaks Silence Over Controversy: वादग्रस्त प्रकरणानंतर प्रणित मोरेनं व्हिडीओ शेअर करत माफी मागितली.

Pranit More on Controversy: 370 रुपयांच्या बिर्याणीचा (370 Biryani) वाद अन् डॉ. सेजल पवार (Sejal Pawar) हिनं मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर केलेली अश्लील टिपण्णी, सध्या कॉमेडी शोमधील ऑडियन्समुळे प्रणित मोरे (Pranit more) चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रणित मोरेच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या हिमांशू जांगडाने तरुणीसोबत डेटवर गेल्याचा अनुभव शेअर केला.  '370 रुपये बिर्याणीवर खर्च केले, आता ते वसूल करावे लागतील ना...' असं म्हणत त्यानं तरुणीकडून शारीरिक जवळीक अपेक्षित असल्याचं आपल्या वक्तव्यातून सूचित केले. यावरुन प्रणित मोरेसह सगळे हसत होते. शोमधील या वक्तव्याला विरोध न केल्यामुळे प्रणित मोरेवरही टीका करण्यात आली.  प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार या तिघांविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा  दाखल केला. हिमांशू जांगडाला आपली नोकरी गमवावी लागली. डॉ. सेजल पवार हिच्याही अडचणीत वाढ होत आहे.  या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रणितने आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट केलं. वाद इतका चिघळला की त्यानं आज इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करुन जाहीर माफी मागितली.

प्रणित मोरेनं माफी मागत, चूक सुधारण्यासाठी संधी मागितली (pranit more apology)

माफी मागत प्रणित मोरे म्हणाला की, 'गेल्या काही दिवसांपासून मला बोलायचं होतं, पण माझं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झालं होतं. तुम्ही सर्वांनी माझा एक व्हिडीओ पाहिला असेल, माझ्यावर टीका होत आहे. त्या तरुणासोबत मी क्राऊडवर्क करत होतो. तेव्हा त्यानं काही अपमानास्पद गोष्टी बोलल्या. सर्व जण हसत होते, मी देखील भावनेच्या भरात वाहून गेलो.  मी त्यावेळी थांबवू शकलो असतो, पण त्यावेळी मी ते करु शकलो नाही. जे कुणी दुखावले असतील, मी त्यांची माफी मागतो'.

'कायदेशीर कारवाईला मी सहकार्य करतो. मी  चांगला माणूस बनून दाखवेन अन् माझ्या कंटेटवर काम करेन', असं प्रणित मोरे आपल्या व्हिडीओत म्हणाला. 

370 रुपयांच्या बिर्याणीचा वाद नेमका आहे तरी काय? (370 Biryani Controversy)

नुकत्याच पार पडलेल्या कॉमेडी शोमध्ये   हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार हे सहभागी झाले होते.   प्रणित मोरेच्या शोमध्ये हिमांशूनं डेटिंगच्या अनुभवाबद्दल सांगितले होते. त्यानं एका तरुणीला डेटवर नेले होते. 370 रुपयांची बिर्याणी तरुणीला खाऊ घातली. पैसे तरुणाने भरले.  पैसे भरल्यामुळे आता त्या बदल्यात आपल्याला तरुणीकडून काहीतरी मिळायला हवे, असे विचार त्याने सर्वांसमोर मांडले.  हे ऐकून प्रणित मोरेसह सर्व जण हसले.  याचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. यानंतर हिमांशूला नोकरीवरुन काढण्यात आले. 

राष्ट्रीय महिला आयोगानेही या संपूर्ण घटनेची दखल घेतली. महाराष्ट्र सायबर सेलनेही प्रणित मोरे अन् हिमांशू विरोधात गुन्हे दाखल केले. 

डॉ. सेजल पवार हा वाद नेमका आहे तरी काय? (Doctor Sejal Pawar On Death Bodies Controversy)

डॉ. सेजल पवार हिनं प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती.  तिनं यावेळेस कॉलेजमधील शवविच्छेदनाचा अनुभव शेअर केला होता.  तिनं या शोमध्ये, डेड बॉडीचे प्रायव्हेट पार्ट पाहून जोक मारायचो, असं तिनं म्हटलं होतं.  यामुळे मोठा वाद निर्माण झाला.  सायबर सेलने तिला चौकशीसाठी बोलावलं आहे. दरम्यान, डॉ. सेजल पवार हिनं लेखी माफी मागितली असून, तिनं केलेल्या वक्तव्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याची तिनं कबूली दिली. सुत्रांच्या माहितीनुसार, सेजलवर कॉलेज प्रशासनाकडून निलंबनाची किंवा इतर मोठी कारवाई केली जाणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मला एक संधी द्या...प्रणित मोरेचा माफीनामा; शोमधील वादावर अखेर स्पष्टीकरण, माफी मागत काय काय म्हणाला?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
Embed widget